Natarajan Ruturaj Gaikwad, IPL 2022 CSK vs SRH Live: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नई आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी यंदाच्या हंगामात आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. तशातच चेन्नईच्या डावाची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. ऋतुराज गायकवाडचा नटराजनने उडवलेला त्रिफळा भाव खाऊन गेला.
चेन्नईकडून रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड खेळायला आले. दोघांनी संयमी सुरूवात केली होती. उथप्पा हवेत फटका खेळताना १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराजकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण टी नटराजनने पहिल्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडवला. पहिला चेंडू त्याने इनस्विंग केला. ऋतुराजला चेंडू समजलाच नाही. चेंडू पटकन आत वळला आणि तो १६ धावांवर बोल्ड झाला.
दरम्यान, हैदराबादच्या संघाने स्पेशल चाल खेळून संघात दोन बदल केले. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) कडून खेळलेला परदेशी खेळाडू मार्को यान्सिन (Marco Jansen) याला संघात शेपर्डच्या जागी स्थान देण्यात आले. तसेच अब्दुल समदच्या जागी शशांक सिंगला संधी देण्यात आली. चेन्नईच्या संघानेही एक बदल केला. त्यांनी महिश तिक्षणा याला ड्वेन प्रिटोरियसच्या जागी संघात जागा दिली.
सनरायझर्स हैदराबाद संघ- 1 अभिषेक शर्मा, 2 केन विल्यमसन (कर्णधार), 3 राहुल त्रिपाठी, 4 एडन मार्करम, 5 निकोलस पूरन (विकेटकीपर), 6 शशांक सिंग, 7 वॉशिंग्टन सुंदर, 8 भुवनेश्वर कुमार, 9 मार्को यान्सिन, 10 उमरान मलिक, 11 टी नटराजन
चेन्नई सुपर किंग्ज- 1 ऋतुराज गायकवाड, 2 रॉबिन उथप्पा, 3 मोईन अली, 4 अंबाती रायुडू, 5 रवींद्र जाडेजा (कर्णधार), 6 शिवम दुबे, 7 महेंद्रसिंग धोनी (विकेटकीपर), 8 ड्वेन ब्राव्हो, 9 महेश तिक्षणा, 10 ख्रिस जॉर्डन, 11 मुकेश चौधरी