भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि बॉलिवूडमधील अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिच यांनी नववर्षाच्या सुरुवातीला दुबईत गुपचुप साखरपुडा केला. हार्दिकनं इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करून हे जाहीर केले आणि त्यानंतर सर्वांना ही गुड न्यूज समजली. साखरपुडा उरकून हे नवं जोडपं गुरुवारी सकाळी मुंबईत परतले.
हार्दिकनं बोटीवर ( याच) फिल्मी स्टाईलनं नताशाला प्रपोज केले. त्यांच्या या साखरपुड्याला हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी यांच्यासह काही जवळचे मित्र हजर होते. हार्दिकने ही गोड बातमी इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून जाहीर केली. या फोटोखाली त्याने ''मै तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्थान, अशी कमेंट्स केली आहे.
'बादशाह' या म्युझिक व्हिडीओत DJ वाले बावू या गाण्यानं नताशाला प्रसिद्धी मिळवून दिली. हार्दिकच्या या गोड बातमीवर नताशाचा Ex-Boyfriend अली गोनीनं बोलकी प्रतिक्रिया दिली. नच बलीए या डान्स रिअॅलिटी कार्यक्रमाच्या नवव्या सत्रात नताशानं ex-boyfriend अली गोनीसह सहभाग घेतला होता. या जोडीला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
2018मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या 'Zero' या चित्रपटात नताशा छोट्याश्या भूमिकेत दिसली होती. त्यात तिनं अभय देओलच्या गर्लफ्रेंड्सचे काम केले होते. सत्याग्रह ( 2013), फुकरे रिटर्न ( 2017) आणि डॅडी ( 2017) या चित्रपटांत तिनं डान्स आयटम केले होते. बिग बॉसच्या आठव्या सत्रातही नताशानं सहभाग घेतला होता. पण, 28 दिवसानंतर तिची घरातून रवानगी झाली.