देशातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 794 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 74 नवे रुग्ण आढळल्याचं नुकतंच आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. मंगळवारपासून देशात कर्फ्यू जाहीर झाल्यानंतरही लोकं घराबाहेर पडताना दिसत आहेत. पोलीस यंत्रणा त्यांना आवरण्याचा प्रयत्न करत असले तरी लोकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चिडला आहे. शुक्रवारी त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून लोकांना देशाशी प्रामाणिक राहण्याची विनंती केली आहे.
तो म्हणाला,''एक भारतीय नागरिक म्हणून मी तुमच्याशी बोलत आहे. कर्फ्यूच पालनं न करणं, रस्त्यावर गर्दी करून फिरणारे लोग हे गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे. आपण या युद्धाला खुप हलक्यात घेत आहोत, असं मला हे सर्व पाहून वाटलं. आपल्याला वाटते तेवढी ही लढाई सोपी नाही. त्यामुळे माझं सर्वांना आवाहन आहे की सोशल डिस्टन्सचा पालन करा. सरकारच्या नियमांचं पालन करा.''
''तुमच्या एका चुकीनं कुटुंबीय संकटात येऊ शकता. आपलं सरकार आणि डॉक्टर खूप मेहनत घेत आहेत. आपण आपली जबाबदारी पार पाडल्यास, त्यांना यश मिळेल. रस्त्यावर फिरणे, मज्जामस्ती करणे ही देशाशी बैमानी आहे. आपल्यासोबत मिळून हे संकट दूर होताना मला पाहायचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की नियमांचे पालन करा,'' अशी विनंती त्यानं केली.
पाहा व्हिडीओ...
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का शर्मा यांनी मिळून एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ''आपण सर्व एका आव्हानात्मक परिस्थितीतून जात आहोत. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखला जाऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी घरी थांबण्याची गरज आहे. आम्ही दोघंही स्वतःच्या आणि इतरांच्याही सुरक्षिततेसाठी घरीच थांबत आहोत. एकांतवासात जाऊन सुरक्षित राहू....,'' असा संदेश या दोघांनी दिला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीला मिळाली कलाटणी; अझरुद्दीननं सांगितली पडद्यामागची गोष्ट
UEFA Champions Leagueच्या फुटबॉल सामन्यामुळे इटलीत पसरला महाभयंकर Corona Virus?
Big Breaking : सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत
'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार
Sachin Tendulkarच्या नावानं पैसे गोळा करतोय न्यूझीलंडचा गोलंदाज; पण का?
MS Dhoniनं 1 लाखांची मदत केल्याचं वृत्त खोटं? पत्नी साक्षीनं केला महत्त्वपूर्ण खुलासा
Web Title: The nation needs our support and honesty, Virat Kohli appeal to Indian citizens svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.