ललित नहाटा
चेन्नई : तमिळनाडू संघाने पुरुषांच्या गटात आणि भारतीय रेल्वे संघाने महिलांच्या गटात आपआपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करुन ६८व्या वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत विजेतेपद जिंकले. महाराष्ट्राच्या महिला संघाला तमिळनाडूविरुद्ध ६७-८४ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांना सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
जवाहरलाल नेहरू स्टेडियमच्या कोर्टवर संपलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या गटात तमिळनाडू संघाने सेनादल संघाचा ९४-८६ गुणांनी पराभव करुन विजेतेपद जिंकले. महिलांच्या अंतिम सामन्यात रेल्वे संघाने छत्तीसगड संघाचा १००-७१ गुणांनी फडशा पाडून विजेतेपद आपल्याकडेच राखले. तत्पूर्वी ६ व्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने आक्रमक खेळ करताना पाचव्याच मिनिटाला १०-८ अशी आघाडी घेतली. यानंतर उंचपुºया साक्षी अरोरा हिने जबरदस्त खेळ करताना महाराष्ट्राला पहिल्या क्वार्टरमध्ये २३-१९ असे आघाडीवर नेले. तमिळनाडूने जबरदस्त पुनरागमन करताना अप्रतिम बास्केट करायचा धडाकाच लावला. याजोरावर त्यांनी मध्यंतराला ४०-३३ अशी आघाडी घेत महाराष्ट्राला दबावाखाली आणले.
तिसºया क्वार्टरमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राने झुंजार खेळ केला. कर्णधार शिरीन लिमयेचे ३, तर श्रुती शेरिगरचे ४ गुण या जोरावर महाराष्ट्राने केवळ एका गुणाची ५३-५२ अशी नाममात्र आघाडी घेत आपल्या आशा कायम राखल्या. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात मात्र महाराष्ट्राच्या खेळामध्ये सांघिक कामगिरीचा अभाव
दिसून आला. तसेच, सदोष नेमबाजीचा फटकाही बसल्याने महाराष्ट्राच्या चुकांचा फायदा घेत तमिळनाडूने अखेर ८४-६७ अशी बाजी मारली.
Web Title: National Basketball: Indian Railways, Tamil Nadu team champions, Maharashtra women sixth place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.