Join us  

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर नवीन उल हकने केलं गौतम गंभीरवर भाष्य, म्हणाला...

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 1:24 PM

Open in App

संपूर्ण स्पर्धेत कमजोर गोलंदाजी म्हणून गणल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी मोक्याच्या वेळी दमदार कामगिरी केली. वेगवान गोलंदाज आकाश मढवालच्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने एलिमिनेटर लढतीत लखनौ सुपरजायंट्सला ८१ धावांनी नमवत दुसऱ्या क्वालिफायर लढतीत प्रवेश केला. 

लखनौकडून नवीन उल हकने चांगली गोलंदाजी केली. नवीन-उल-हकने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या आयपीएल २०२३ मधील एलिमिनेटर सामन्यात केवळ ३८ धावांत चार विकेट घेतल्या. त्याने मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या फळीतील महत्त्वाचे फलंदाज तंबूत माघारी धाडले. नवीनने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव कॅमेरॉन ग्रीन आणि तिलक वर्मा यांच्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. 

मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतर नवीन उल हकने लखनौ संघाचा मार्गदर्शक (Mentor) गौतम गंभीरवर भाष्य केलं आहे. गौतम गंभीर दिग्गज क्रिकेटपटू आहे. त्याने भारतीय क्रिकेटसाठी काय केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मी त्यांचा एक मार्गदर्शक म्हणून आदर करतो. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो, असं नवीन उल हकने म्हटलं आहे.

विराट कोहली आणि नवीन यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आयपीएल २०२३ मधून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु बाहेर गेल्यावर नवीन-उल-हकने कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्याने आरसीबीच्या पराभवानंतर 'गोड आंबे...' अशी स्टोरी इंस्टाग्रामवर पोस्ट केली होती. नवीनने कोहलीला डिवचण्यासाठी सोशल मीडियावर अनेक स्टोरी आणि पोस्ट केल्या होत्या. त्यानंतर आता लखनौही आयपीएल २०२३ मधून बाहेर गेल्यावर आरसीबीचे चाहते नवीनला ट्रोल करताना दिसत आहे.

पराभवानंतर कृणाल पांड्या म्हणाला...-

एका टप्प्यावर आम्ही चांगल्या स्थितीत होतो, पण जेव्हा मी तो शॉट खेळलो तेव्हा सर्व काही चुकीचे झाले. आम्ही चांगले क्रिकेट खेळायला हवे होते. तो शॉट योग्य नव्हता, त्याला मी पूर्णपणे जबाबदार आहे. बॅटवर चांगला चेंडू येत होता. त्या मोक्याच्या वेळेनंतर आम्ही चांगले क्रिकेट खेळलो नाही, असं कृणाल पांड्याने सांगितले. 

मेयरचा चांगला रेकॉर्ड-

क्विंटन डी कॉक हा दर्जेदार फलंदाज आहे, पण मेयरचा येथे चांगला रेकॉर्ड आहे, म्हणून आम्ही त्याच्यासोबत (प्लेइंग इलेव्हनमध्ये) पुढे गेलो. त्यांचे फलंदाज वेगवान गोलंदाजांविरुद्ध खरोखरच चांगली फलंदाजी करतात, म्हणून मी त्यांच्याविरुद्ध फिरकी गोलंदाजीने सुरुवात करण्याचा विचार केला.

टॅग्स :गौतम गंभीरआयपीएल २०२३लखनौ सुपर जायंट्स
Open in App