Join us  

"मी IPL खेळायला आलोय, शिव्या खायला नाही", 'विराट' वादानंतर लखनौच्या नवीनची प्रतिक्रिया

naveen-ul-haq ipl 2023 : आयपीएलमध्ये काल झालेला सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2023 5:11 PM

Open in App

Virat Kohli vs Gautam Gambhir । लखनौ : आयपीएल २०२३ मधील लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना अनेक नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिला. विराट कोहली, गौतम गंभीर आणि नवीन-उल-हक हे या वादात केंद्रस्थानी होते. अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन हा फलंदाजी करत असताना मोहम्मद सिराजची गोलंदाजी सुरू होती. तेव्हा विराट आणि त्याच्यात काहीतरी बिनसल्याचे पाहायला मिळाले. सामना संपल्यानंतर या वादाला वेगळे वळण लागले. नंतर लखनौचा कर्णधार लोकेश राहुलने मध्यस्थी करून नवीन आणि कोहली यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण अफगाणी खेळाडूने विराटला भेटण्यास नकार दिला.

"तुम्ही ज्यासाठी पात्र असता ते मिळतेच आणि हो हे असेच झाले पाहिजे. गोष्टी अशाच चालत राहिल्या पाहिजेत", अशा शब्दांत नवीनने कालच्या वादावर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या घटनेबाबत तो लखनौच्या संघातील एकाला म्हणाला होता, "मी इथे आयपीएल खेळण्यासाठी आलो आहे, कोणाच्याही शिव्या ऐकण्यासाठी नाही." जेव्हा विराट आणि सिराज नवीनच्या बॅटिंगवेळी त्याच्याशी बोलत होते तेव्हा अमित मिश्राने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण कोहली थांबला नाही आणि सतत काहीतरी सांगत राहिला. सामना संपल्यानंतर जेव्हा कोहली आणि नवीन समोर आले तेव्हा सुरुवातीला दोघांनी हस्तांदोलन केले. पण इथेही दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर नवीनने कोहलीचा हात झटकला.

पुन्हा एकदा 'नवीन' वादातनवीन-उल-हक त्याच्या तापट स्वभावासाठीही ओळखला जातो. लंका प्रीमियर लीगदरम्यान पाकिस्तानच्या मोहम्मद आमिर आणि शाहिद आफ्रिदीसोबतही त्याचा वाद झाला होता. त्याच्या स्वभावाबद्दल नवीनने एकदा एका कार्यक्रमात म्हटले होते, "जर कोणी माझ्याकडे येऊन काही बोलले तर मी मागे हटणार नाही. मी लहानपणापासून असाच आहे. असा माझा स्वभाव आहे. उद्यापासून मी बदलेन असे म्हणत असेल तर मी खरे बोलत नसेन. मला कोणी काही बोलावे आणि मी माघार घेतो असे मी म्हटले तर ते कधीच होऊ शकत नाही. कारण आक्रमकता माझ्या शरीरात आहे, ती माझ्या डीएनएमध्ये आहे."

लखनौचा १८ धावांनी पराभव कालच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आरसीबीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. कर्णधार फाफ डू प्लेसिस (४४) आणि विराट कोहली (३१) वगळता कोणत्याच आरसीबीच्या फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. निर्धारित २० षटकांत आरसीबीचा संघ ९ बाद १२६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनौच्या फलंदाजांची देखील वाईट अवस्था झाली. कृष्णप्पा गौतम (२३) वगळता एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. कर्णधार लोकेश राहुलच्या दुखापतीमुळे लखनौच्या संघाची डोकेदुखी वाढली. अखेर लखनौचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १९. ५ षटकांत १०८ धावांवर सर्वबाद झाला. आरसीबीने १८ धावांनी विजय मिळवून लखनौला पराभवाची धूळ चारली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :आयपीएल २०२३विराट कोहलीलखनौ सुपर जायंट्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरगौतम गंभीर
Open in App