आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

Virat Kohli Vs Naveen Ul Haq: नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2023 12:04 PM2023-05-22T12:04:59+5:302023-05-22T12:08:16+5:30

whatsapp join usJoin us
Naveen-ul-Haq's cryptic post after RCB lose playoffs berth despite Virat Kohli's record century | आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

आरसीबीचा पराभव अन् काही क्षणांत नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट; कोहलीला डिवचल्याची चर्चा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

प्ले ऑफसाठी विजय आवश्यक असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला (आरसीबी) अखेर थोडक्यात अपयश आले. विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतर आरसीबीला शुभमन गिलच्या नाबाद शतकी तडाख्याचा सामना करावा लागला. या जोरावर गुजरात टायटन्सने ६ गड्यांनी बाजी मारताना आरसीबीला यंदाच्या आयपीएलमधून बाहेर केले. तसेच, गुजरातच्या विजयाचा फायदा झालेल्या मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

आरसीबीचा पराभव झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे दु:ख व्यक्त केले. ट्विटरवर विराट कोहलीसह आरसीबी ट्रेंडिंगमध्ये पाहायला मिळाले. याचदरम्यान लखनौ संघाचा नवीन उल हकची इन्स्टाग्राम पोस्ट विशेष ठरली. नवीन उल हक यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. मैदानातून सुरू झालेला लखनऊ आणि आरसीबीमधील वाद सोशल मीडियावर सुरूच असल्याचे पाहायला मिळाले. 

आरसीबीचा संघ प्ले ऑफमधून बाहेर होताच मुंबईचं जोरदार सेलिब्रेशन; गिलने षटकार मारला अन्...

गुजरातविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. आरसबीचा पराभव होताच काही मिनिटांत नवीन उल हकने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एक टीव्ही अँकर सतत हसताना आणि टाळ्या वाजवताना दिसतो. नवीनने आरसीबी किंवा विराटचे नाव लिहिलेले नाही. पण स्टोरी का ठेवली हे त्याच्या मेसेज वरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, गुजरातच्या विजयाने मुंबई इंडियन्स मात्र चौथ्या सीटवरून प्ले ऑफमध्ये पोहोचले. GT vs CSK यांच्यात क्वालिफायर १चा सामना २३ मे रोजी चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे, तर २४ मे रोजी MI vs LSG अशी एलिमिनेटर लढत होईल. त्यानंतर क्वालिफायर २ सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर २६ तारखेला होईल. यात क्वालिफायर १ मधील पराभूत आणि एलिमिनेटर मधील विजयी संघ खेळतील. २८ मे रोजी अहमदाबाद येथेच अंतिम सामना होईल. 

Web Title: Naveen-ul-Haq's cryptic post after RCB lose playoffs berth despite Virat Kohli's record century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.