Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..."

Navjot Singh Sidhu Angry on Travis Head Celebration: भारतीय संघाचा धमाकेदार फलंदाज Rishabh Pant बाद झाल्यावर ट्रेव्हिस हेडने अजब सेलिब्रेशन केले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:11 IST2024-12-31T15:07:43+5:302024-12-31T15:11:33+5:30

whatsapp join usJoin us
Navjot singh sidhu criticizes Travis Head celebration after dismissing Rishabh Pant suugest stringent punishment | Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..."

Aus vs Ind: ट्रेव्हिस हेडच्या 'विचित्र' सेलिब्रेशनवर सिद्धू भडकला, म्हणाला- "त्याला अशी शिक्षा द्या की..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Navjot Singh Sidhu Angry on Travis Head Celebration: बॉर्डर गावसकर (BGT 2024) ट्रॉफीतील चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा (Ind vs Aus 4th Test) १८४ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर ४७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने नितीश कुमार रेड्डीच्या शतकामुळे ३६९ धावांचा पल्ला गाठला. तिसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया २३४ धावांत ऑलाऊट झाली. अखेर ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १५५ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या जोडीने संघर्ष करण्याचा प्रयत्न केला होता. पण पंत ३० धावांवर बाद झाला. त्यावेळी सेलिब्रेशन करताना ट्रेव्हिस हेडने जो इशारा केला, त्यावरून वादंग निर्माण झाला आहे. आता भारताचा माजी सलामीवीर नवजोत सिंग सिधूने यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय डावाच्या ५९व्या षटकांत पंतला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंतला मिचेल मार्शने झेलबाद केले. यानंतर ट्रेव्हिस हेडने विचित्र हातवारे करत विकेटचे सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सिद्धूला हे सेलिब्रेशन अजिबात आवडले नाही. या घटनेसाठी ट्रेव्हिस हेडला कठोर शिक्षा व्हायला हवी असे तो म्हणाला. नवज्योतसिंग सिद्धूने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, “मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रेव्हिस हेडचे असभ्य वर्तन जेंटलमेन्स गेमसाठी अजिबात चांगले नाही. लहान मुले, महिला, तरुण आणि वृद्ध मंडळी सामना पाहत असताना हे सर्वात वाईट उदाहरण आहे. या वर्तनामुळे एका व्यक्तीचा नव्हे तर सव्वाशे कोटी भारतीयांचा अपमान झाला आहे. हेडला अशी कठोर शिक्षा द्यावी की ते भावी पिढ्यांसाठी उदाहरण ठरेल, जेणेकरून कोणीही असे करण्याची हिंमत करू शकणार नाही.'

पॅट कमिन्सचे हेडच्या सेलिब्रेशनवर स्पष्टीकरण

पॅट कमिन्स म्हणाला की, त्याने बरेच झेल घेतले. त्यामुळे त्याला असे दाखवायचे असावे की त्याच्या हाताची बोटं आता गरम झाली असून त्याला बर्फाने भरलेल्या एखाद्या ग्लासमध्ये हाताची बोटं घालून ठेवावी लागतील. तो प्रकार खूपच कॉमेडी आहे. त्यात वाईट किंवा विचित्र असे काहीच नाही. त्याने जुन्या प्रकारचे सेलिब्रेशन पुन्हा एकदा केले.

भारतीय फलंदाजीने पाचव्या दिवशी ३४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे गुडघे टेकले. कर्णधार रोहित शर्मा (९), केएल राहुल (०), विराट कोहली (५), रविंद्र जाडेजा (२), नितीश कुमार रेड्डी (१) हे सर्व फलंदाज साधी दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत. यशस्वी जैस्वालने सलामीला आल्यापासून संघाची एक बाजू लावून धरली. त्याने २०८ चेंडूंचा सामना करत ८४ धावांची अत्यंत झुंजार खेळी केली. पण त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. रिषभ पंतने काही काळ संघर्ष केला. १०४ चेंडू खेळल्यानंतर तो देखील ३० धावांवर माघारी परतला. अखेर आकाश दीप (७), जसप्रीत बुमराह (०) आणि मोहम्मद सिराज (०) या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळून ऑस्ट्रेलियाने मोठा विजय मिळवला.

Web Title: Navjot singh sidhu criticizes Travis Head celebration after dismissing Rishabh Pant suugest stringent punishment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.