Join us  

...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा

India vs Pakistan Match Updates : भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 7:42 AM

Open in App

India vs Pakistan Match : ट्वेंटी-२० विश्वचषकात रविवारी ९ जून रोजी कट्टर प्रतिस्पर्धी अर्थात भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने असणार आहेत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ही लढत होणार आहे. या सामन्यापूर्वी क्रिकेट विश्वातील जाणकार आपापली मतं मांडत आहेत. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू नवज्योतसिंग सिद्धू यांनी भारत आणि पाकिस्तान या सामन्यादरम्यान घडणाऱ्या गोष्टींबाबत भाष्य केले. पाकिस्तानला अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागल्याने भारताला याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

नवज्योतसिंग सिद्धू म्हणाले की, भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात अपेक्षांचे दडपण असते. पराभव कोणीची पचवू शकत नाही. पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एखाद्या खेळाडूने चांगली कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिल्यास तो इतर सामन्यांमध्ये काय करतो याने काही फरक पडत नाही. कारण पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातील कामगिरीमुळे तो हिरो होतो. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव स्वीकारला आहे, त्यामुळे हा भारताला एक फायदा होईल. अमेरिकेविरुद्ध सामना हरणे हा एक पाकिस्तानसाठी मानसिक धक्का आहे. दुसरीकडे भारताची एक जमेची बाजू आहे ती म्हणजे एक गच्च भरलेले स्टेडियम आणि एकच भारतीय गाणे असेल, सारे जहाँ. से अच्छा हिंदुस्तान हमारा. सिद्धू वृत्तसंस्था ANI शी बोलत होते. 

विश्वचषकासाठी भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह. 

राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद.

पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.

पाकिस्तानचे पुढील सामने - ९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील

टॅग्स :नवज्योतसिंग सिद्धूभारत विरुद्ध पाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ