नवी दिल्ली : भारत दौऱ्यावर येणा-या वेस्ट इंडीजविरुद्ध होणा-या दोन दिवसीय सराव सामन्यासाठी बोर्ड एकादश संघ जाहीर झाला आहे. बडोदा येथे २९ सप्टेंबरपासून होणा-या या सामन्यात करुण नायरकडे बोर्ड एकादश संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले. बीसीसीआयच्या निवड समितीने या सामन्यासाठी १३ खेळाडूंची निवड केली आहे. त्यात जबरदस्त सूर गवसलेला मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणारा हनुमा विहारी आणि अंकित बावणे याच्यासह अनेक युवा खेळाडूंना संघात संधी देण्यात आली आहे.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना राजकोट येथे ४ ते ८ आॅक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना हैदराबाद येथे १२ ते १६ आॅक्टोबरदरम्यान होणार आहे.
Web Title: Nayar captains for the warm-up game against the West Indies
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.