नवी दिल्ली : युवा ब्रिगेड शुभम मावी आणि कमलेश नागरकोटी यांना जखममुक्त करण्यात राष्टÑीय क्रिकेट अकादमीने मोलाची भूमिका वठवली. दोन वर्षांच्या आत या दोघांना उत्कृष्ट गोलंदाज बनवले.
नागरकोटी आणि मावी हे २०१८ ला आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकादरम्यान चमकले. दोघांनीही अनेक फलंदाजांमध्ये स्वत:च्या वेगवान गोलंदाजीमुळे धडकी भरवली. वेगवान गोलंदाजांची ही नवी बॅच जगात खळबळ माजवेल, असे चित्र निर्माण झाले होते. तथापि दोघांनाही जखमांनी ग्रासले. त्याचवेळी एनसीएने दोघांनाही जखममुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावली.
आयपीएलमध्ये करारबद्ध झाल्यानंतर दोघांनीही पुन्हा नव्या दमाने मारा करण्यास सुरुवात केली. २० वर्षांचा नागरकोटी ३० महिन्यानंतर आयपीएलद्वारे प्रथमच स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये उतरला. त्याने २१ वर्षांच्या मावीसोबत केकेआरसाठी शानदार कामगिरी करीत बुधवारी राजस्थान रॉयल्सच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.
बीसीसीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकानंतर कमलेशच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले होते. त्याच्या घोट्यावरदेखील विपरीत परिणाम झाला. बीसीसीआयने कमलेशला ब्रिटनमध्ये नेऊन तज्ज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर जवळपास दीड वर्ष तो एनसीएत होता.
हा अधिकारी पुढे म्हणाला, ‘शिवमदेखील आठ महिने एनसीएत होता. त्याला अंतर्गत लिगामेंटची जखम झाली, शिवाय स्ट्रेसचा परिणाम जाणवू लागला. कमलेशच्या तुलनेत मात्र तो लवकर बरा झाला. मागच्यावर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळताना तो पुन्हा जखमी झाला होता.
नागरकोटीने सामन्यानंतर द्रविड आणि अन्य लोकांचे नाव घेऊन सर्वांचे आभार मानले. मावीने देखील एनसीएचे कौतुक करताना मुख्य फिजिओ आशिष, फिजिाओ अमित त्यागी यांनी माझ्या दुखापतींवर लक्ष ठेवून लवकर जखममुक्त केले, असे आवर्जून सांगितले.
मागच्या दोन सत्रात पुर्नवसन आणि जखमांवरील उपचाराचा खर्च जवळपास दीड कोटीच्या घरात आहे. बीसीसीआय आणि एनसीएने दोन्ही खेळाडूंना काहीही त्रास जाणवू दिला नाही. एनसीएत वैद्यकीय तपासणी, आऊटसोर्स फिजिओथेरपी सत्र आदींचा खर्च बीसीसीआयने केला. एनसीए प्रमुख राहुल द्रविड आणि मुख्य फिजियो आशिष कौशिक यांना श्रेय द्यायला हवे.
Web Title: NCA's great contribution in Mavi-Nagarkoti wound healing
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.