India vs Sri Lanka, 2nd Test Pink Ball Test Live Updates : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला २०१९नंतर सुरू झालेला आंतरराष्ट्रीय शतकांचा दुष्काळ श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही संपवता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या घरच्या मैदानावर होत असलेल्या दिवस-रात्र कसोटीत विराट ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करेल, असे वाटले होते. पण, त्याला दोन्ही डावांत अपयश आले. १८ कसोटी सामन्यांत त्याला शतक झळकावता आले नाही आणि त्याचा फटका एका विश्वविक्रमी कामगिरीवर झाला. सहा वर्ष विराटच्या नावावर असलेला विश्वविक्रम आज तो दुसऱ्या डावात १३ धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्याला ठरवून बाद केल्याचे या मालिकेत पाहायला मिळाले.
विराट कोहलीने मोहाली कसोटीत ४५ धावांची खेळी केली. त्याची ही १००वी कसोटी होती, परंतु त्यातही त्याला शतकापासून वंचित रहावे लागले. लसिथ एम्बूल्देनियाने अप्रतिम चेंडू टाकून विराटचा त्रिफळा उडवला. पण, तो बंगळुरूत शतक झळकावले अशी भाबडी आशा होती. शतकासह या सामन्यात त्याचा मोठा विक्रम दावावर लागला होता. Pink Ball Test मध्ये विराटने ४२पेक्षा कमी धावा केल्यास, ६ वर्ष त्याच्या नावावर असलेला मोठा विक्रम धुळीस मिळणार होता. विराटने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये ५०+ सरासरी कायम ठेवली होती. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विराटने ४२ किंवा त्यापेक्षा कमी धावा केल्यास कसोटीतील त्याची सरासरी ५०च्या खाली येणार होती.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात विराट २३ धावांवर धनंजया डि सिल्वाच्या गोलंदाजीवर LBW झाला आणि आज तो १३ धावांवर प्रविण जयाविक्रमाच्या गोलंदाजीवर LBW झाला. हे दोन्ही चेंडू खूप खाली राहिल्याने विराटला अंदाज आला नाही. कसोटीतील त्याची सरासरी ४९.९५ अशी झाली. २०१७नंतर प्रथमच कसोटीतील त्याची सरासरी ५०च्या खाली आली आहे.
या मालिकेपूर्वी त्याची कसोटी सरासरी ही ५०.३५ इतकी होती. २०१९च्या कसोटी शतकानंतर त्याने २८.७५च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ७०व्या शतकापर्यंत त्याची सरासरी ही ५४.९७ इतकी होती. इंग्लंडविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर केलेल्या २३५ धावांच्या खेळीनंतर विराटने कसोटीत प्रथमच ५०+ सरासरी पार केली . त्यानंतर २०१९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीतील २५४ धावांच्या खेळीने विराटने कारकिर्दीतील सर्वोत्तम ५५.१० ही सरासरी गाठली. मात्र, त्यानंतर त्याची सरासरी घसरत चालली आहे.
पाहा विराट या मालिकेत कसा बाद झाला...
Web Title: ND vs SL, 2nd Test Pink Ball Test Live Updates : Virat Kohli's Test average is now 49.95. The last time Kohli averaged below 50 was in August 2017, see how he out in this series, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.