Team India Announced for T20 World Cup 2024 : १ जूनपासून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. या स्पर्धेसाठी सर्व २० संघ पात्र ठरले आहेत आणि पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होईल. भारत-पाकिस्तान ( IND vs PAK) यांच्यात ९ जून २०२४ मध्ये न्यू यॉर्क येथे हाय व्होल्टेज सामना होणार आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांच्यात रविवारी २८ एप्रिलला दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर आज आगरकरने अहमदाबाद येथे बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
हार्दिक पांड्याच्या निवडीवरून या बैठकीत भरपूर चर्चा झाली. रोहित शर्मासोबत सलामीला यशस्वी जैस्वाल याचे स्थान पक्के होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव हेही पक्के होते. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंत फ्रंट रनर असला तरी दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅसमन व लोकेश राहुल यांच्याबाबत चर्चा केली गेली. संजू सॅमसनने बाजी मारली. हार्दिककडून उप कर्णधारपद काढून घेतलं जाईल अशी चर्चा होती, परंतु याला आज पूर्णविराम मिळाला. हार्दिकने संघातील जागा कायम राखलीच, शिवाय उप कर्णधारपदही टिकवलं आहे. आयपीएल गाजवणाऱ्या शिवम दुबेला संधी देण्याचा योग्य निर्णय निवड समितीने घेतला आहे.
युझवेंद्र चहल व कुलदीप यादव ही जोडी पुन्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसणार आहे. संजूच्या मेहनतीला यश मिळालं आहे.
भारताचा वर्ल्ड कप संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह ( Indian team for the T20I World Cup: Rohit (C), Hardik (VC), Jaiswal, Kohli, Surya, Pant, Samson, Dube, Jadeja, Axar, Kuldeep, Chahal, Arshdeep, Siraj, Bumrah.)
राखीव खेळाडू - शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद
पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची गटवारी अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ
भारतीय संघाचे वेळापत्रक
५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल