आयला! आंतरराष्ट्रीय सामना की लोकल?; चेंडू शोधायला खेळाडूंसह सारेच पोहोचले जंगलात, Video

England vs Netherland ODI : इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना दुसरा संघ इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सविरुद्ध वन डे सामना खेळतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 04:32 PM2022-06-17T16:32:23+5:302022-06-17T16:36:19+5:30

whatsapp join usJoin us
NED vs ENG : Dawid Malan smashed massive six, Netherlands players and ground staff goes to search ball in near jungle, Video  | आयला! आंतरराष्ट्रीय सामना की लोकल?; चेंडू शोधायला खेळाडूंसह सारेच पोहोचले जंगलात, Video

आयला! आंतरराष्ट्रीय सामना की लोकल?; चेंडू शोधायला खेळाडूंसह सारेच पोहोचले जंगलात, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Netherland ODI : इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना दुसरा संघ इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सविरुद्ध वन डे सामना खेळतोय. नेदरलँड्स दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( १) माघारी परल्यानंतर फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) यांनी १५०+ भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितित आणले आहे. मलानने ९व्या षटकात एक असा उत्तुंग षटकार खेचला की चेंडू शोधण्यासाठी नेदरलँड्सच्या खेळाडूंसह ग्राऊंड स्टाफला नजिकच्या जंगलात जावे लागले. 

जेसन रॉय व फिल सॉल्ट ही जोडी सलामीला आली, परंतु शेन स्नॅटरने दुसऱ्या षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्याने जेसन रॉयचा ( १) त्रिफळा उडवला. पण, त्यानंतर सॉल्ट व मलान या जोडीने दमदार खेळ केला आहे. या दोघांनी २५ षटकांत संघाला १ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. मलान ६८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर खेळतोय, तर सॉल्टने ८२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक ठरले. 


 

Web Title: NED vs ENG : Dawid Malan smashed massive six, Netherlands players and ground staff goes to search ball in near jungle, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.