Join us  

NED vs ENG : १४ चेंडूंत ७२ धावा; Jos Buttler ने झळकावले दुसरे जलद शतक; डेवीड मलान व फिल सॉल्टचीही सेंच्युरी!

England vs Netherland ODI :इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. फिल सॉल्ट, डेवीड मलान यांच्यानंतर जोस बटलर यानेही शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 5:58 PM

Open in App

England vs Netherland ODI : इंग्लंडचा एक संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी सज्ज होत असताना दुसरा संघ इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली नेदरलँड्सविरुद्ध वन डे सामना खेळतोय. इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पार चुराडा केला. फिल सॉल्ट, डेवीड मलान यांच्यानंतर जोस बटलर ( Jos Buttler) यानेही शतक झळकावून इंग्लंडला ४२ षटकांत २ बाद ३६८ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे.

नेदरलँड्स दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाला पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. दुसऱ्या षटकात जेसन रॉय ( १) माघारी परल्यानंतर फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) यांनी २२२ भागीदारी करताना संघाला मजबूत स्थितीत आणले. जेसन रॉय व फिल सॉल्ट ही जोडी सलामीला आली, परंतु शेन स्नॅटरने दुसऱ्या षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्याने जेसन रॉयचा ( १) त्रिफळा उडवला. पण, त्यानंतर सॉल्ट व मलान या जोडीने दमदार खेळ केला आहे. या दोघांनी २५ षटकांत संघाला १ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. मलान ६८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ६९ धावांवर खेळतोय, तर सॉल्टने ८२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक ठरले. 

९३ चेंडूंत १४ चौकार ३ षटकार खेचून सॉल्ट १२२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड मलानने वन डेतील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. जोस बटलरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा मलान हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला  ( Dawid Malan becomes only the second male England player to hit a ton in every format of the international game ). सॉल्ट बाद झाल्यानंतर जोस बटलर फलंदाजीला आला आणि त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर धावांचा वेग अधिकच वाढवला. त्याने पुढील २० चेंडूंत तुफान फटकेबाजी करताना शतक पूर्ण केले. जोसने ४७ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. याआधी बटलरनेच पाकिस्तानविरुद्ध ४६ चेंडूंत शतक झळकावले होते. 

टॅग्स :इंग्लंडजोस बटलर
Open in App