NED vs ENG : World Record! इंग्लंडने नोंदवली वन डेतील सर्वोच्च धावसंख्या; Jos Buttlerसह तिघांचे शतक, विक्रमांचा पाऊस 

England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 06:41 PM2022-06-17T18:41:04+5:302022-06-17T19:27:47+5:30

whatsapp join usJoin us
NED vs ENG : NEW WORLD RECORD, England have now passed the highest total in men's ODI history, England finish on 498 for 4, Jos Buttler, Phil Salt & Dawid Malan hit 100s  | NED vs ENG : World Record! इंग्लंडने नोंदवली वन डेतील सर्वोच्च धावसंख्या; Jos Buttlerसह तिघांचे शतक, विक्रमांचा पाऊस 

NED vs ENG : World Record! इंग्लंडने नोंदवली वन डेतील सर्वोच्च धावसंख्या; Jos Buttlerसह तिघांचे शतक, विक्रमांचा पाऊस 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Netherland ODI : जोस बटलर ( Jos Buttler), फिल सॉल्ट ( Phil Salt ) व डेवीड मलान ( Dawid Malan ) या इंग्लंडच्या फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. दुसऱ्या षटकात जेसन रॉयला बाद केल्यामुळे नेदरलँड्सचे गोलंदाज आनंदी होते, परंतु फिल सॉल्ट व डेवीड मलान यांनी २२२ धावांची भागीदारी करून त्यांना भानावर आणले. त्यानंतर जोस बटलरचे वादळ घोंगावले. त्याने ४७ चेंडूंत शतक पूर्ण केले. एका वन डे सामन्यात एकाच संघातील तीन फलंदाजांनी शतक झळकावण्याची ही तिसरी वेळ आहे.  बटलर व लिएम लिव्हिंगस्टोनने तुफान फटकेबाजी करताना ३५० ते ४५० हा टप्पा अवघ्या २६ चेंडूंत गाठून दिला. इंग्लंडने वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम मोडला.


जेसन रॉय व फिल सॉल्ट ही जोडी सलामीला आली, परंतु शेन स्नॅटरने दुसऱ्या षटकात इंग्लंडला धक्का दिला. त्याने जेसन रॉयचा ( १) त्रिफळा उडवला. सॉल्टने ८२ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह शतक पूर्ण केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे हे पहिले शतक ठरले. 

९३ चेंडूंत १४ चौकार ३ षटकार खेचून सॉल्ट १२२ धावांवर माघारी परतला. त्यानंतर डेव्हिड मलानने वन डेतील पहिले शतक झळकावताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. जोस बटलरनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा मलान हा इंग्लंडचा दुसरा फलंदाज ठरला. जोस बटलर फलंदाजीला आला आणि त्याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांवर प्रहार केला. त्याने २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर धावांचा वेग अधिकच वाढवला. त्याने पुढील २० चेंडूंत तुफान फटकेबाजी करताना शतक पूर्ण केले. जोसने ४७ चेंडूंत ६ चौकार व ८ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून हे दुसरे सर्वात जलद शतक ठरले. याआधी बटलरनेच पाकिस्तानविरुद्ध ४६ चेंडूंत शतक झळकावले होते. 
 
५० किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंत सर्वाधिक ३ शतकांचा विक्रम आज बटलरने केला. शाहिद आफ्रिदीने दोन वेळा असा पराक्रम केला होता. मलान १०९ चेंडूंत ९ चौकार व ३ षटकारांसह १२५ धावांवर बाद झाला. त्याने बटलरसह तिसऱ्या विकेटसाठी ९० चेंडूंत १८४ धावांची भागीदारी केली, परंतु त्यापैकी १३९ धावा या बटलरने ६० चेंडूंत कुटल्या होत्या. मलानने ३९ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या लिएम लिव्हिंगस्टोनने पहिल्या ७ चेंडूंत 1,4,6,6,6,4,6 अशी फटकेबाजी करताना ३३ धावा जोडल्या. त्याच्या या फटकेबाजीने इंग्लंडने ४४४+ धावा करून वन डे क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम भागीदारी केली. इंग्लंडनेच २०१६मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ बाद ४४४ धावा केल्या होत्या. 

लिव्हिंगस्टोनने १७ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडकडून हे सर्वात जलद अर्धशतक ठरले. यापूर्वी इय़ॉन मॉर्गनने २१ चेंडूंत २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. बटलरने ६५ चेंडूंत १५० धावा करताना वन डेतील दुसरे जलद १५० धावा करण्याचा विक्रम केला. इंग्लंडने ४ बाद ४९८ धावा करताना वन डे क्रिकेटमध्ये नव्या वर्ल्ड रेकॉर्डची नोंद केली. त्यांनी स्वतःचाच ६ बाद ४८१ ( वि. ऑस्ट्रेलिया, २०१८) धावांचा विक्रम मोडला. बटलर ७० चेंडूंत ७ चौकार व १४ षटकारांसह १६२ धावांवर, तर लिव्हिंगस्टोन २२ चेंडूंत ६ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. 

Web Title: NED vs ENG : NEW WORLD RECORD, England have now passed the highest total in men's ODI history, England finish on 498 for 4, Jos Buttler, Phil Salt & Dawid Malan hit 100s 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.