२१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गुरूवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:41 PM2024-02-29T14:41:51+5:302024-02-29T14:43:16+5:30

whatsapp join usJoin us
NED vs NAM T20I - Michael Levitt (135) became a Youngest men to score T20I century against ODI status teams, break Yashasvi Jaiswal record | २१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

२१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

NED vs NAM T20I - आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गुरूवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया यांच्यातल्या लढतीत मिचेल लेव्हिट ( Michael Levitt ) याने ६२ चेंडूंत १३५ धावांची विक्रमी फलंदाजी केली. नेदरलँड्सकडून ट्वेंटी-२०तील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याच्या खेळीत ११ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. त्याने चौकार-षटकारांनी २१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस पाडला. नेदरलँड्सच्या सायब्रँड इंग्लेब्रेचने ४० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली.  नेदरलँड्सने २० षटकांत ५ बाद २४७ धावांचा डोंगर उभा केला.


या सामन्यात मिचेलने नेदरलँड्सकडून ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला, शिवाय त्यांनी ट्वेंटी-२०तील त्यांची सर्वोत्तम ( ५-२४७) धावांचा विक्रमही मोडला. मिचेल व सायब्रँड यांनी १९३ धावांची भागीदारी केली, जी नेदरलँड्सकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.

वन डे क्रिकेट संघाचा दर्जा असलेल्या संघाविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान मिचेलने आज पटकावला. त्याने २० वर्ष व २५५ दिवसांचा असताना हे शतक झळकावले. त्याने अफगाणिस्तानच्या हझरतुल्लाह जझाईचा ( २० वर्ष व ३३७ दिवस वि. आयर्लंड, २०१९) आणि भारताच्या यशस्वी जैस्वालचा ( २१ वर्ष व २७९ दिवस वि. नेपाळ २०२३) यांचा विक्रम मोडला.   



लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला अपयश आले. २०  षटकांत त्यांना ७ बाद १८८ धावा करता आल्या.  त्यांच्या जॅन फ्रायलिंकने सर्वाधिक ४२ धावा केल्या. 
 

Web Title: NED vs NAM T20I - Michael Levitt (135) became a Youngest men to score T20I century against ODI status teams, break Yashasvi Jaiswal record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.