Join us  

२१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गुरूवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 2:41 PM

Open in App

NED vs NAM T20I - आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गुरूवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया यांच्यातल्या लढतीत मिचेल लेव्हिट ( Michael Levitt ) याने ६२ चेंडूंत १३५ धावांची विक्रमी फलंदाजी केली. नेदरलँड्सकडून ट्वेंटी-२०तील ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्याच्या खेळीत ११ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. त्याने चौकार-षटकारांनी २१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस पाडला. नेदरलँड्सच्या सायब्रँड इंग्लेब्रेचने ४० चेंडूंत ७ चौकार व ५ षटकारांसह ७५ धावांची खेळी केली.  नेदरलँड्सने २० षटकांत ५ बाद २४७ धावांचा डोंगर उभा केला.

या सामन्यात मिचेलने नेदरलँड्सकडून ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नोंदवला, शिवाय त्यांनी ट्वेंटी-२०तील त्यांची सर्वोत्तम ( ५-२४७) धावांचा विक्रमही मोडला. मिचेल व सायब्रँड यांनी १९३ धावांची भागीदारी केली, जी नेदरलँड्सकडून सर्वोत्तम भागीदारी ठरली.

वन डे क्रिकेट संघाचा दर्जा असलेल्या संघाविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा मान मिचेलने आज पटकावला. त्याने २० वर्ष व २५५ दिवसांचा असताना हे शतक झळकावले. त्याने अफगाणिस्तानच्या हझरतुल्लाह जझाईचा ( २० वर्ष व ३३७ दिवस वि. आयर्लंड, २०१९) आणि भारताच्या यशस्वी जैस्वालचा ( २१ वर्ष व २७९ दिवस वि. नेपाळ २०२३) यांचा विक्रम मोडला.   

लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाला अपयश आले. २०  षटकांत त्यांना ७ बाद १८८ धावा करता आल्या.  त्यांच्या जॅन फ्रायलिंकने सर्वाधिक ४२ धावा केल्या.  

टॅग्स :टी-20 क्रिकेटयशस्वी जैस्वाल