कोहलीच्या नेतृत्वात बदलाची गरज: लक्ष्मण

सहकारी खेळाडूंसाठी ‘आदर्श रोल मॉडेल’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 12:46 AM2020-12-17T00:46:30+5:302020-12-17T00:47:12+5:30

whatsapp join usJoin us
Need for change in virat Kohlis leadership says vvs Laxman | कोहलीच्या नेतृत्वात बदलाची गरज: लक्ष्मण

कोहलीच्या नेतृत्वात बदलाची गरज: लक्ष्मण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : विराट कोहली आपल्या सहकाऱ्यांसाठी ‘आदर्श रोल मॉडेल आहे,’यात वाद नाही, तथापि त्याच्या नेतृत्वात अद्यापही सुधारणेस वाव असल्याचे मत माजी दिग्गज शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने व्यक्त केले आहे. स्वत:च्या भूमिकेबाबत कोहलीमध्ये समर्पक भावना आहे, पण क्षेत्ररक्षणात तो थोडी बचावात्मक भूमिका घेतो शिवाय संघात सातत्याने बदल करीत असतो, सहकाऱ्यांमध्ये त्याने विश्वास निर्माण करायला हवा,’असे लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्‌सच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात बोलताना सांगितले.

‘माझ्यामते कोहली हा मैदानात पूर्णपणे व्यस्त असतो. तो एवढा व्यस्त असतो की त्याच्या चेहऱ्यावर लगेच भाव दिसून येतात. विराट ज्या पद्धतीने मैदानात समर्पण करतो, ते मला आवडते. फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण त्याचे लक्ष मैदानात सर्व ठिकाणी असते. माझ्यामते ही गोष्ट कोहलीकडून शिकायला हवी. कोहली मैदानात एक सकारात्मक वातावरण निर्माण करतो आणि त्याचा फायदा संघातील खेळाडूना होत असल्याचे पाहायला मिळते.

कोहलीने २०१४ ला कसोटी संघाचे तर २०१७ ला वन डे संघाचे नेतृत्व सांभाळले. काही वेळा तो अधिक बचावात्मक वागत असल्याने आणि वारंवार बदल करीत असल्याने सहकाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे माझे निरीक्षण आहे. कोणत्याही खेळाडूला संघात स्थिरता हवी असते. संघासाठी सर्वेात्कृष्ट कामगिरी करण्यावर त्याचे लक्ष केंद्रित व्हायचे असेल तर त्याला सुरक्षा हवी असते. विराटने वारंवार बदल करण्याची सवय सोडायला हवी,’ असे लक्ष्मणने नमूद केले आहे.

अजिंक्यने केले अनेकांना निरुत्तर
 कोहली मायदेशी परतल्यावर नेमका काय प्लॅन असेल, याबाबत उपकर्णधार अजिंक्य रहाणेला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे अजिंक्यने जे उत्तर दिले ते अनेकांना निरुत्तर करणारे होते. तो  म्हणाला,‘ मी वर्तमानात जगतो. सध्याचा क्षण माझ्यासाठी फार महत्वाचा आहे.  विराट हा भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि तो पहिला सामना खेळणार आहे.  मी फक्त या सामन्याबाबत विचार करत आहे आणि कोहलीला कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्नशील आहे. विराट मायदेशी परतला की त्यानंतर आम्ही चर्चा करणार आहोत,’

Web Title: Need for change in virat Kohlis leadership says vvs Laxman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.