Neeraj Chopra । नवी दिल्ली : शेफाली वर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय महिला संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना, बलाढ्य इंग्लंडला 7 बळींनी नमवत पहिल्या आयसीसी 19 वर्षांखालील महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. विशेष म्हणजे महिला क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात भारताचे हे पहिले विश्वविजेतेपद ठरले. वरिष्ठ स्तरावर भारतीय संघाला तीन वेळा विश्वचषक स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र, यावेळी पहिला विश्वचषक पटकावून दिला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर भारताचा ऑलिम्पिकवीर नीरज चोप्राने संघाला कडक सॅल्युट केला.
दरम्यान, नीरज चोप्राने सामन्यापूर्वी भारतीय मुलींचे मनोबल वाढवले होते. यादरम्यान नीरजने मुलींना प्रोत्साहन देण्यासोबतच फायनलच्या दबावाला तोंड देण्यासाठी महत्त्वाच्या टिप्सही दिल्या होत्या. बीसीसीआयने नीरज चोप्रा आणि भारतीय संघ यांच्यातील भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अंडर-19 विश्वचषकात भारतीय खेळाडूंचा बोलबालास्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू -
- श्वेता सेहरावत (भारत) - 297 धावा
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 293 धावा
- शेफाली वर्मा (भारत) - 172 धावा
- इमान फातिमा (पाकिस्तान) - 157 धावा
- जॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड) - 155 धावा
सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू -
- मॅगी क्लार्क (ऑस्ट्रेलिया) - 12 बळी
- पार्श्वरी चोप्रा (भारत) - 11 बळी
- हॅना बेकर (इंग्लंड) - 10 बळी
- अनोसा नासिर (पाकिस्तान) - 10 बळी
- ग्रेस स्क्रिवेन्स (इंग्लंड) - 9 बळी
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"