Where To Watch India vs Sri Lanka Live Streaming : येत्या २७ तारखेपासून श्रीलंका आणि भारत यांच्यात ट्वेंटी-२० मालिका खेळवली जात आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वातील टीम इंडिया श्रीलंकेच्या धरतीवर दाखल झाली आहे. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, नेहमीप्रमाणे चाहत्यांना जियो सिनेमा किंवा हॉटस्टारवर हे सामने पाहता येणार नाहीत.
भारत आणि श्रीलंका या मालिकेचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार नेटवर्क किंवा डिस्नी हॉटस्टारवर होणार नाही. याशिवाय जियो सिनेमावरही हे सामने पाहता येणार नाहीत. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहत्यांना ही मालिका पाहता येईल. सोनी टेन ५ वर इंग्रजी आणि सोनी टेन ३ वर हिंदी समालोचन असेल. तसेच Sony Liv ॲप आणि त्यांच्या वेबसाईटवरही सामन्यांचे लाईव्ह कव्हरेज असेल. पण, याचे Subscription घेण्यासाठी चाहत्यांना पैसे मोजावे लागतील.
भारताचा वन डे संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, लोकेश राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
भारताचा ट्वेंटी-२० संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
दरम्यान, २७ जुलैपासून श्रीलंका आणि भारत यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेला सुरुवात होत आहे. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ट्वेंटी-२० आणि वन डे मालिका खेळेल. टीम इंडियाचा नवनिर्वाचित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरची ही पहिली परीक्षा असेल.
ट्वेंटी-२० मालिकेचे वेळापत्रक -पहिला सामना - २७ जुलै - संध्याकाळी ७ वा.दुसरा सामना - २८ जुलै - संध्याकाळी ७ वा.तिसरा सामना - ३० जुलै - संध्याकाळी ७ वा.
वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.दुसरा सामना - ४ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.तिसरा सामना - ७ ऑगस्ट - दुपारी २.३० वा.