विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं अजिबात आव्हानात्मक नाही, मोहम्मद आमीरचा दावा

विराट व रोहित यांच्या फटकेबाजीमुळे अनेक गोलंदाजांची झोप उडाली आहे. पण पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीर याचं मत काही वेगळं आहे,

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 11:47 AM2021-05-21T11:47:56+5:302021-05-21T11:48:21+5:30

whatsapp join usJoin us
Neither Virat Kohli nor Rohit Sharma, Mohammad Amir names the toughest batsman to bowl against | विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं अजिबात आव्हानात्मक नाही, मोहम्मद आमीरचा दावा

विराट कोहली, रोहित शर्मा यांना गोलंदाजी करणं अजिबात आव्हानात्मक नाही, मोहम्मद आमीरचा दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित षटकांच्या संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा हे जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज आहेत. विराट व रोहित यांच्या फटकेबाजीमुळे अनेक गोलंदाजांची झोप उडाली आहे. अनेक गोलंदाजांनी ते मान्यही केले आहेत. पण, पाकिस्तानी संघाचा माजी गोलंजाज मोहम्मद आमीर ( Mohammad Amir) याला तसं वाटत नाही. आमीर हाही जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, यात वाद नाही. पण, त्याच्या मते विराट व रोहित हे जगातील आव्हानात्मक फलंदाज अजिबात नाहीत. BCCIला २५०० कोटींची चिंता; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची ECBला विनंती?

त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याला विराट व रोहित यांना गोलंदाजी करताना कधीच आव्हान वाटले नाही. त्यानं ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ( Australian captain Steve Smith ) याला गोलंदाजी करणं अधिक आव्हानात्मक असल्याचे सांगितले. त्याचे फलंदाजीचे तंत्र तोडणे अवघड असल्याचे तो म्हणाला. ''मला कोणाला गोलंदाजी करताना आव्हान वाटलं असेल, तर ती स्टीव्ह स्मिथला. त्याची फलंदाजीची शैली ही वेगळी आहे. तो फलंदाजीला अशा पद्धतीनं उभा राहतो की त्याला नेमकी गोलंदाजी कशी करावी, हेच कळत नाही. त्याला आऊट-स्वींग टाकला तर तो बॅट वर करून चेंडू सोडून देतो. चेंडू पॅडवर टाकला तर तो फ्लिक करतो. त्यामुळे त्याला गोलंदाजी करणं आव्हानात्मक आहे,''असे तो म्हणाला.  टीम इंडियाच्या सलामीवीराच्या घरी दुःखद घटना; कोरोना व्हायरसमुळे गमावली जवळची व्यक्ती! 

'रोहित शर्माला गोलंदाजी करणं अधिक सोपं'
विराट व रोहित यांना गोलंदाजी करणं कधीच आव्हानात्मक वाटले नाही. या दोघांमध्ये तुलना केल्यास रोहितला गोलंदाजी करणं अधिक सोपं असल्याचे आमीरनं मान्य केलं. इन-स्वींग चेंडूवर रोहित चाचपडतो आणि सहज विकेट फेकतो, असेही तो म्हणाला. ''या दोघांनाही गोलंदाजी करताना कधीच आव्हान वाटलं नाही. रोहितला तर गोलंदाजी करणं अधिक सोपं.. मी त्याला सहज बाद करू शकतो. तो डावखुऱ्या गोलंदाजाच्या इन-स्वींगवर चाचपडतो. त्यापेक्षा विराटला गोलंदाजी करणं थोडं अवघड आहे,''असेही त्यानं सांगितले.  

पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर ( Pakistan pacer Mohammad Amir) यानं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. २९ वर्षीय आमीर हा सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे आणि तेथील नागरिकत्व स्वीकारून आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहत आहे. आमीर सध्या लंडनचे नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी तो पाकिस्तानचे नागरिकत्व सोडण्यासही तयार आहे आणि जर तो ब्रिटीश नागरिक झालाच तर आयपीएलमध्ये खेळण्यासाठी तो पात्र ठरू शकतो.

Web Title: Neither Virat Kohli nor Rohit Sharma, Mohammad Amir names the toughest batsman to bowl against

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.