Nepal Cricket: स्पिरिट ऑफ क्रिकेट! नेपाळी विकेटकीपरची खिलाडू वृत्ती पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा VIDEO

Nepal Cricket: क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी असे क्षण पाहायला मिळतात, जे सर्वांनाच चकित करतात. नेपाळी विकेटकीपरच्या खिलाडू वृत्तीचा व्हिडिओ पाहाच.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:49 PM2022-02-16T15:49:57+5:302022-02-16T15:50:37+5:30

whatsapp join usJoin us
Nepal Cricket: Spirit of Cricket! You will also appreciate Nepali wicketkeeper's after seeing this video | Nepal Cricket: स्पिरिट ऑफ क्रिकेट! नेपाळी विकेटकीपरची खिलाडू वृत्ती पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा VIDEO

Nepal Cricket: स्पिरिट ऑफ क्रिकेट! नेपाळी विकेटकीपरची खिलाडू वृत्ती पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा VIDEO

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटला 'जेंटलमन्स गेम' असेही म्हटले जाते. पण, अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूंमध्ये स्लेजिंगच्या अनेक घटना घडत असून, याच जेंटलमन्स गेमवर गालबोल लागल्याचे पाहायला मिळत आहे. पण, क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी असे क्षण पाहायला मिळतात, जे सर्वांनाच चकित करतात. 

नुकताच आयसीसीने न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्कार दिला. T-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मिचेलच्या वागणुकीचे आयसीसीने कौतुक केले आणि 2021 साठी 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' ही उपाधी दिली. पण, नेपाळच्या एका खेळाडूने मैदानावर दाखवलेल्या खिलाडू वृत्तीसाठी त्याला आगामी 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी आशा चाहत्यांची इच्छा आहे.

14 फेब्रुवारीला आयर्लंड आणि नेपाळमध्ये खेळल्या गेलेल्या टी-20 क्रिकेटमध्ये नेपाळचा यष्टिरक्षक फलंदाज आसिफ शेखने (Aasif Sheikh) असे काही केले आहे की, ते पाहून चाहते त्याला सलाम करत आहेत. झालं असं की, आयर्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान आयर्लंडचे फलंदाज मार्क अडायर आणि अँडी मॅकब्राईन 19व्या षटकात फलंदाजी करत होते. त्याच षटकात नेपाळी गोलंदाज कमल सिंगच्या तिसऱ्या चेंडूवर मार्क अडायरने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क झाला नाही, त्यामुळे चेंडू फार दूर गेला नाही आणि जवळच पडला.

अशा स्थितीत नॉन स्ट्राइकवर उभा असलेला अँडी मॅकब्राईन झटपट धावा घेण्यासाठी धावला, तर गोलंदाज त्याच्या जवळ असलेला चेंडू पाहून तो पकडण्यासाठी चेंडूकडे धावला. यादरम्यान गोलंदाज आणि मॅकब्राईन यांच्यात टक्कर झाली आणि फलंदाज अडखळून पडला. यावेळी गोलंदाजाने चेंडू पकडला आणि विकेटकीपरच्या दिशेने फेकला. पण, यष्टिरक्षक आसिफने खिलाडू वृत्ती दाखवत फलंदाजाला धावबाद केले नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेपाळच्या या यष्टीरक्षकाचे खूप कौतुक केले जात. 

Web Title: Nepal Cricket: Spirit of Cricket! You will also appreciate Nepali wicketkeeper's after seeing this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nepalनेपाळ