बारबाडोस : टी-२० विश्वचषक स्पर्धेत नेपाळ आणि नेदरलँड्स हे संघ काही अनपेक्षित निकाल नोंदवू शकतात. नेदरलँँड्सने काही सामन्यांत प्रभावी कामगिरी केली असून, नेपाळनेही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आपली गुणवत्ता दाखवून दिली आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज यष्टिरक्षक ॲडम गिलख्रिस्ट याने व्यक्त केले.
नेपाळ आणि नेदरलँड्स यांचा ड गटात समावेश असून, यामध्ये बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचाही समावेश आहे. गिलख्रिस्ट म्हणाला की, माझ्या मते नेपाळ शानदार कामगिरी करू शकेल. त्यांच्याकडे असे काही खेळाडू आहेत, जे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मोठ्या लीगमध्ये खेळत आहेत. नेदरलँड्सने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला नमवण्याची कामगिरी केली होती.
गिलख्रिस्टने सांगितले की, नेदरलँड्सचा संघ कायम आव्हान निर्माण करतो. ते पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेच्याच गटात आहेत. गेल्या विश्वचषकात त्यांनी दक्षिण आफ्रिकेला नमवले होते आणि यंदाही ते धक्कादायक निकाल नोंदवू शकतात.