Join us  

नेपाळने मारली बाजी

नेपाळने येथे क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले आॅफमध्ये पापुआ न्यू गिनीला सहा गड्यांनी बाद करत क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळवला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 1:27 AM

Open in App

हरारे : नेपाळने येथे क्रिकेट विश्वचषक पात्रता प्ले आॅफमध्ये पापुआ न्यू गिनीला सहा गड्यांनी बाद करत क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळवला आहे.नेपाळच्या गोलंदाजांनी या विजयाचा पाया रचला. संदीप लामिचने आणि दीपेंद्र ऐरी यांनी प्रत्येकी चार गडी बाद केले. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ २७.२ षटकांत ११४ धावांवर बाद झाला. पापुआ न्यू गिनीने संपूर्ण स्पर्धेत ढिसाळ फलंदाजी केली. या स्पर्धेतील पाचपैकी चार सामन्यात त्यांनी २०० पेक्षा कमी धावसंख्या केली आहे. या पराभवाने पापुआ न्यू गिनी त्यांचा एकदिवसीय दर्जा गमावू शकतात.