Stephan Myburgh Retirement: नेदरलँड्स संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत धक्कादायक निकाल नोंदवला. ग्रुप २ मधून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देत बाहेर फेकला. मात्र या सामन्यात नेदरलँड्सकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाने अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे.
नेदरलँडचा स्टार खेळाडू स्टीफन मायबर्गने (Stephan Myburgh) अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. मायबर्गने इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ३८ वर्षीय स्टीफनच्या या घोषणेने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
दरम्यान,प्रथम फलंदाजीला उतरताना नेदरलँड्सने ४ बाद १५८ धावा केल्या. स्टीफन मायबर्ग ( ३७), मॅक्स ओ'डाऊड ( २९) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर ( ३५) व कॉलिन एकरमन ( ४१*) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला.
केशव महाराजने दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने कमाल करून दाखवली होती. विजयासाठी आवश्यक धावांची सरासरी वाढल्यामुळे दबावात द.आफ्रिकेचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. अखेरच्या आफ्रिकेला ८ बाद १४५ धावाच करता आल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Netherlands star player Stephan Myburgh has suddenly announced his retirement.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.