मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदावर अखेर रवी शास्त्रीच यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. या पदासाठी सहा जणांमध्ये चुरस रंगली होती, परंतु शास्त्रींनी अपेक्षेप्रमाणे बाजी मारली. कॅप्टन विराट कोहलीनेही आपले वजन शास्त्रींच्या तराजूत टाकले होते. त्यामुळे कोहलीची ईच्छा पूर्ण झाल्याचे बोलले जात आहे. पण, शास्त्री यांची निवड क्रिकेट चाहत्यांना पटणारी नाही. त्यांनी सोशल मीडियावर शास्त्रींना ट्रोल करायला सुरुवात केली...
शास्त्री यांनी भारताकडून खेळताना त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याचबरोबर समालोचनही त्यांनी केले आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शास्त्री यांना या पदावर कायम ठेवणार की त्यांचे हे पद जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रवी शास्त्री हे संघाचे जून 2016 पर्यंत संचालक होते. 2017 मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली.