Join us  

शाहिन आफ्रिदीवर IPL 2022 Mega Auction मध्ये २०० कोटींची बोली लागली असती, पाकिस्तानी पत्रकाराचा दावा अन्... 

 इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी नुकतेच मेगा ऑक्शन पार पडले... २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मिळून ५५१ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 1:29 PM

Open in App

 इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी नुकतेच मेगा ऑक्शन पार पडले... २०४ खेळाडूंसाठी फ्रँचायझींनी मिळून ५५१ कोटींहून अधिक रक्कम खर्च केली. मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) सर्वाधिक १५.२५ कोटी रुपये खर्च करून यष्टिरक्षक इशान किशनला ( Ishan Kishan) आपल्या ताफ्यात घेतले. यंदा २० कोटींची विक्रमी बोली लागेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण, इशान यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यात आता पाकिस्तानी पत्रकाराने मोठा दावा केला. पाकिस्तानचा युवा गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Shah Afridi) लिलावात असता तर त्याच्यासाठी २०० कोटींची बोली लागली असती असा दावा या पत्रकाराने केला... मग काय नेटिझन्सनी त्याची शाळा घेतली.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये शाहिन आफ्रिदीची कामगिरी दमदार होताना दिसत आहे. आयसीसीनेही त्याला २०२१मधील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे. पण, आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंवर बंदी घातली गेली आहे. त्यामुळेच २००८ चे पर्व वगळल्यास पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळलेच नाही आणि तशी शक्यताही भविष्यात वाटत नाही. पण, पाकिस्तानी पत्रकार स्वप्न  रंगवताना दिसत आहेत. पाकिस्तानी पत्रकाराच्या मते आयपीएल ऑक्शनमध्ये आफ्रिदी असता, तर त्याची बोली २०० कोटींपर्यंत गेली असती. असा दावा केला आहे.   २००८मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर आयपीएलमध्ये बंदी घातली गेली. आयपीएलच्या पहिल्या पर्वात ११ पाकिस्तानी खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली होती.  आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये महागडे ठरलेले खेळाडू 

  • इशान किशन - १५.२५ कोटी, मुंबई इंडियन्स
  • दीपक चहर - १४ कोटी, चेन्नई सुपर किंग्स
  • श्रेयस अय्यर - १२.२५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स
  • लाएम लिव्हिंगस्टोन - ११.५० कोटी, पंजाब किंग्स
  • शार्दूल ठाकूर - १०.७५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
  • हर्षल पटेल - १०.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • वनिंदू हसरंगा - १०.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 
  • निकोलस पूरन - १०.७५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
  • ल्युकी फर्गुसन - १० कोटी, गुजरात टायटन्स
  • प्रसिद्ध कृष्णा - १० कोटी, राजस्थान रॉयल्स
  • आवेश खान - १० कोटी, लखनौ सुपर जायंट्स

टॅग्स :आयपीएल लिलावपाकिस्तान
Open in App