कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी सर्व क्षेत्रातील सेलिब्रेटी पुढे आले आहेत. पण, इरफान आणि युसूफ पठाण यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. पठाण बंधुंनी सुरुवातीला स्थानिक हॉस्पिटल्सना 4000 माक्सचं वाटप केलं. सोमवारी त्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकताना गरजूंसाठी 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला. पण, समाजकार्य करून देशसेवा करणाऱ्या इरफानवर काही नेटिझन्सनी धर्मावरून टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता घरातील सर्व लाईट्स ऑफ करुन घरात दिवा लावून एकतेचा संदेश दिला. या दिवा लावण्याच्या मोहिमेत देशातील क्रीडापटूंनीही सहभाग घेतला. महान फलंदाज सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, हरभजन सिंग यांच्यासह मेरी कोम, हिमा दास, पी व्ही सिंधू यांनीही रविवारी दिवा पेटवून मोदींच्या आवाहनला साथ दिली. इरफाननेही त्यात सहभाग घेतला, परंतु काही लोकांनी फटाके फोडल्यानं त्यानं नाराजी व्यक्त केली.