Join us  

भारत-पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका होणार? विनोद राय यांचं मोठं विधान

2013नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका झालेलीच नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 9:56 AM

Open in App

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांचे संबंध पाहता उभय देशांत द्विदेशीय क्रिकेट मालिका होणे, अश्यकच. 2013नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका झालेलीच नाही. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) आणि आशिया चषक स्पर्धेत हे संघ एकमेकांना भिडतात. पण, भारत - पाकिस्तान यांच्यातील द्विदेशीय मालिकेसंदर्भात बीसीसीआयच्या प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी मोठं विधान केलं आहे.

फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा अशी मागणी झाली होती. पण, हा सामना झाला. बर्मिंगहॅम येथील एडबस्टन स्टेडियमवर कडक सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या या सामन्यात भारतानं डकवर्थ लुइस नियमानुसार 89 धावांनी विजय मिळवला.

पण, जेव्हा द्विदेशीय क्रिकेट मालिकेचा विचार येतो, तेव्हा नकार घंटा वाजलीच पाहिजे. पण, राय यांनी नुकत्याच एका मुलाखतीत भारत-पाकिस्तान मालिके संदर्भात सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले,''पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी केंद्र सरकारने पॉलिसी बनवली आहे. तुम्ही त्रयस्थ ठिकाणी खेळू शकता आणि एकमेकांच्या देशात नाही. त्यामुळे त्रयस्थ ठिकाणी आम्ही कोणत्याही संघाशी खेळू शकतो, हे आमचं ठाम मत आहे.''

पाकिस्तानने 2013मध्ये भारत दौरा केला होता. त्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं वन डे मालिका 2-1 अशी जिंकली होती. त्यानंतर भारत-पाक मालिका झालेली नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानबीसीसीआय