असा प्रवास ज्याचा विचारही केला नव्हता...! विराट कोहली इमोशनल, राहुल द्रविडसोबत विशेष पोस्ट

विराट कोहलीला १२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध डोमिनिका येथील रोसेओ येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याची आठवण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 11:12 AM2023-07-10T11:12:22+5:302023-07-10T11:12:51+5:30

whatsapp join usJoin us
Never Imagined journey would…; Virat Kohli shared a photo with head coach Rahul Dravid on Instagram, expressing gratitude for their journey bringing them back to Dominica in different roles.  | असा प्रवास ज्याचा विचारही केला नव्हता...! विराट कोहली इमोशनल, राहुल द्रविडसोबत विशेष पोस्ट

असा प्रवास ज्याचा विचारही केला नव्हता...! विराट कोहली इमोशनल, राहुल द्रविडसोबत विशेष पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

विराट कोहलीला १२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध डोमिनिका येथील रोसेओ येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याची आठवण झाली. भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे आणि १२ जुलैपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. १२ वर्षांपूर्वी येथे खेळलेल्या भारतीय संघातील दोनच खेळाडू सध्याच्या संघात आहेत. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरा राहुल द्रविड ( सद्याचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक)... या आठवणीला उजाळा देताना विराटने दी वॉल द्रविडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे आणि डॉमिनिकामध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दोघांना परत आणल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तेव्हा भारताने मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित ठेवत १-० असा विजय मिळवला. या सामन्यातून कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर तो द्रविडचा कॅरिबियनमधील अंतिम कसोटी सामना होता.  

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विखुरलेला, त्यामुळे संघ....! सुनील गावस्करांचं मोठं विधान 


 “२०११मध्ये आम्ही डॉमिनिका येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटीतील दोनच खेळाडू २०२३ मध्ये विंडीज दौऱ्यावर आहोत. हा प्रवास आम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत इथे परत आणेल याची कल्पनाही केली नव्हती. खूप आभारी आहे,” अशी कोहलीने फोटोला कॅप्शन दिली आहे.
 


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ  दोन कसोटी, तीन वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी कॅरेबियन बेटावर आला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा संघ भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र ठरलेला नाही. १९७५ नंतर पुरुषांच्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांची पहिली अनुपस्थिती ठरणार आहे. वेस्ट इंडिजचे मार्गदर्शक आणि माजी कर्णधार, ब्रायन लारा त्यांच्या संधींबद्दल आशावादी आहेत.  
आगामी मालिका कोहलीसाठी WTC फायनलमधील निराशाजनक कामगिरीतून पुनरागमन करण्याची आणि फॉर्म पुन्हा शोधण्याची संधी असणार आहे. द्रविडसाठी हा एक महत्त्वाचा कालावधी आहे, कारण त्याचा करार ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३मध्ये वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपणार आहे. कोहली आणि द्रविड या दोघांनाही या मालिकेदरम्यान त्यांचे कौशल्य दाखवण्याची आणि त्यांच्या संबंधित भूमिकांमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची संधी असेल.

Web Title: Never Imagined journey would…; Virat Kohli shared a photo with head coach Rahul Dravid on Instagram, expressing gratitude for their journey bringing them back to Dominica in different roles. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.