विराट कोहलीला १२ वर्षांपूर्वी वेस्ट इंडिज विरुद्ध डोमिनिका येथील रोसेओ येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याची आठवण झाली. भारतीय संघ सध्या विंडीज दौऱ्यावर आहे आणि १२ जुलैपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. १२ वर्षांपूर्वी येथे खेळलेल्या भारतीय संघातील दोनच खेळाडू सध्याच्या संघात आहेत. एक म्हणजे विराट कोहली आणि दुसरा राहुल द्रविड ( सद्याचा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक)... या आठवणीला उजाळा देताना विराटने दी वॉल द्रविडसोबतचा फोटो पोस्ट केला आहे आणि डॉमिनिकामध्ये वेगवेगळ्या भूमिकेत दोघांना परत आणल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तेव्हा भारताने मालिकेतील तिसरी कसोटी अनिर्णित ठेवत १-० असा विजय मिळवला. या सामन्यातून कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर तो द्रविडचा कॅरिबियनमधील अंतिम कसोटी सामना होता.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विखुरलेला, त्यामुळे संघ....! सुनील गावस्करांचं मोठं विधान
“२०११मध्ये आम्ही डॉमिनिका येथे खेळलेल्या शेवटच्या कसोटीतील दोनच खेळाडू २०२३ मध्ये विंडीज दौऱ्यावर आहोत. हा प्रवास आम्हाला वेगवेगळ्या भूमिकेत इथे परत आणेल याची कल्पनाही केली नव्हती. खूप आभारी आहे,” अशी कोहलीने फोटोला कॅप्शन दिली आहे.