मुंबई : यंदाच्या विश्वचषकाची अंतिम फेरी सुपर ओव्हरमुळे चांगलीच चर्चेत आली होती. न्यूझीलंडने या सामन्यात दर्जेदार खेळ केला, पण फक्त एका नियमामुळे न्यूझीलंडला विश्वचषक गमवावा लागला आणि इंग्लंडने जेतेपद पटकावले. आता नियम आयसीसीने बदलला आहे.
यंदाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरही टाय झाली होती. यावेळी चौकार आणि षटकारांच्या जोरावर इंग्लंडला जेतेपद देण्यात आले होते. या आयसीसीच्या नियमावर चाहत्यांनी जोरदार टीका केली होती. त्यामुळेच आता आयसीसीने या नियमामध्ये बदल केला आहे.
आयसीसीचा नवा नियम काय सांगतो
जर एखाद्या मोठ्या स्पर्धेच्या उपांत्य आणि अंतिम फेरीचा सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. ही सुपर ओव्हरही टाय झाली तर पुन्हा ती खेळवण्यात येईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत सुपर ओव्हर खेळवली जाईल.
Web Title: New ICC rules over super over of finals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.