Join us  

रितिकाची नवी पोस्ट; रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ २०२५ सोडणार? नेटिझन्सनी लावला अंदाज 

मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा ( Mumbai Indians vs Rohit Sharma) यांच्यात काहीतरी बिनसलं आहे, हे नक्की...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2024 11:47 AM

Open in App

मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मा ( Mumbai Indians vs Rohit Sharma) यांच्यात काहीतरी बिनसलं आहे, हे नक्की...  इंडियन प्रीमिअर लीग २०२४च्या तोंडावर मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेतले आणि रोहितकडून कर्णधारपद काढून थेट त्याच्याकडे सोपवले. फ्रँचायझीचा हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. पण, मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांची मुलाखत समोर येण्यापूर्वी हे प्रकरण शांत झाले असे वाटत होते. मात्र, बाऊचर यांच्या मुलाखतीनंतर नवा वाद पेटला आणि त्यात थेट रोहितची पत्नी रितिका सजदेह ( Ritika Sajdeh) हिने उडी घेतली. सर्व काही ठिक नाही, अशी सुचक प्रतिक्रिया तिने दिली. त्यात आता रितिकाच्या नव्या पोस्टने पुन्हा एक चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? Inside Story आली समोर

रोहितकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद काढून का घेतले, यावर बाऊचर यांनी प्रथमच खुलासा करताना हा 'क्रिकेट निर्णय' असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "मला वाटते की हा निव्वळ क्रिकेटचा निर्णय होता. हार्दिकला एक खेळाडू म्हणून परत आणण्यासाठी आम्ही ट्रेड विंडोची वाट पाहिली. माझ्यासाठी हा एक संक्रमणाचा टप्पा आहे. भारतात बऱ्याच लोकांना हे समजत नाहीत, ते खूप भावूक होतात. पण, या निर्णयापासून भावना दूर करा. मला वाटते की एक खेळाडू म्हणून रोहित आता सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल,” असे मार्क बाऊचर यांनी स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर सांगितले होते.

यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत! ( so many things wrong with this) अशी प्रतिक्रिया रितिकाने मार्क बाऊचर यांच्या त्या मुलाखतीच्या पॉडकास्टवर दिली होती. त्यात आज रितिकाने ज्युरासिक वर्ल्ड २०२५ मध्ये येतोय अशी इंस्टा स्टोरी लिहिली आणि त्यावरून रोहित शर्मा २०२५ मध्ये मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याची चर्चा नेटिझन्सनी सुरू केली. पण, असा कोणताच इशारा रितिकाला द्यायचा नाही. कारण, २०२५ मध्ये खरंच नवीन ज्युरासिक वर्ल्ड चित्रपट येत आहे आणि २ जुलैला तो जगभरात रिलीज केला जाणार आहे.  

 

टॅग्स :रोहित शर्मामुंबई इंडियन्सआयपीएल २०२३