नवी दिल्ली : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहेत. भारतासोबतच्या त्याच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. पण सुनक क्रिकेटचे देखील मोठे चाहते आहेत याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे. मोकळ्या वेळात ते क्रिकेट खेळतात. खरं तर ते फिटनेससाठी क्रिकेट खेळतात. याशिवाय ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांना क्रिकेटचे सामने पाहायला देखील आवडतात. इंग्लंडमध्ये शालेय शिक्षणादरम्यान ते स्वतः क्रिकेट खेळले आहेत.
विराट कोहली फेव्हरेट
ऋषी सुनक हे फिटनेसवर खूप लक्ष केंद्रीत करतात आणि त्यासाठीच ते क्रिकेट खेळतात. याशिवाय ते मोकळ्या वेळात सामने देखील पाहतात. खुद्द सुनक यांनी २०१८ मध्ये फेसबुक पोस्टमध्ये क्रिकेटच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. निवडणुक प्रचारादरम्यान देखील ते अनेकवेळा क्रिकेट खेळताना दिसले होते. त्यांचा आवडता खेळाडू विराट कोहली देखील आहे पण २०१९ मध्ये ब्रिटीश पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खासकरून जो रूटचे कौतुक केले होते.
ऋषी सुनक यांच्या फिटनेसची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते. ते त्यांच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेत असतात. लक्षणीय बाब म्हणजे सुनक हे अशा ब्रिटीश राजकारण्यांपैकी एक आहेत जे दारूपासून दूर राहतात. कोणत्याही प्रकारचे पेय आणि मादक पदार्थांपासून ते दूर राहतात. फिटनेससाठी क्रिकेट खेळण्यासोबतच ते इतरही मेहनत घेतात.
सुनक यांच्या समोर अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आव्हान -
पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर ऋषी सुनक आपल्या भाषणात म्हणाले, स्थिर आणि एकसंध पंतप्रधान हे आपले प्राधान्य असेल. पण, कंझर्व्हेटिव्ह पक्षाला एकत्रित ठेवणे सुनक यांच्यासाठी सोपे नाही. ब्रिटनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पट्रीवर आणणे अवघड काम आहे. यामुळेच लिझ ट्रस यांनाही आपली खुर्ची गमवावी लागली आहे. ब्रिटनमध्येही निवडणुकीचीही मागणी होत होती, पण टोरी पक्षाने सुनक यांच्यावर विश्वास दर्शवला. सध्याचा संसदेचा कार्यकाळ जानेवारी २०२५ पर्यंत आहे. या काळात काही अनपेक्षित घडले नाही, तर सुनक हे पुढील तीन वर्ष ब्रिटनच्या पंतप्रधान पदावर राहतील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: New Prime Minister of Britain Rishi Sunak is a fan of cricket and his favorite player is Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.