नवी दिल्ली : आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) क्रिकेट समितीने कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सामन्यात स्थानिक पंचांना संधी देण्याची शिफारस केली आहे. ही शिफारस भारतीय सामनाधिकाऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरू शकते. भारतातील अनेक विद्यमान व माजी सामनाधिकाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय सामन्यांत विशेषत: कसोटी सामन्यांचा विशेष अनुभव नसल्यामुळे भारतातील स्थानिक अम्पायर्ससाठी हे आव्हानात्मक राहील.
गेल्या वर्षी आयसीसीच्या एलिट पॅनलच्या पंचांमधून भारतीय पंच एस. रवी यांना वगळण्यात आले होते. त्यानंतर त्यात एकाही भारतीय पंचाचा समावेश नाही. कसोटी सामन्यांसाठी पंचांची या यादीतून निवड करण्यात येते. त्यापेक्षा खालच्या श्रेणीमध्ये असलेल्या आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलच्या पंचांमध्ये चार भारतीय आहेत. त्यात केवळ नितीन मेनन (३ कसोटी, २४ वन-डे आणि १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने) यांच्याकडे कसोटी सामन्यांचा अनुभव आहे. या व्यतिरिक्त सी. शमशुद्दीन (४३ वन-डे), २१ टी-२० आंतरराष्ट्रीय), अनिल चौधरी (२० वन-डे, २० टी-२० अंतरराष्ट्रीय) आणि वीरेंद्र शर्मा (२ वन-डे व एक टी-२०) यांना कसोटी सामन्यांचा अनुभव नसतानाही हे पंच जानेवारीमध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात खेळल्या जाणाºया कसोटी मालिकेत पंचगिरी करू शकतात.
दोन कसोटी व ३४ वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचाची भूमिका बजावणारे माजी आंतरराष्ट्रीय पंच हरिहरन म्हणाले, ‘हे एक मोठे आव्हान आहे.(वृत्तसंस्था)
Web Title: New recommendations challenging for Indian umpires; Local referee in Test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.