ट्वेंटी-20 World Record; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने घेतली भल्याभल्यांची फिरकी

दक्षिण आफ्रिकेचा 28 वर्षीय गोलंदाज कॉलीन अॅकर्मेनने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गुरुवारी विश्विक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 09:13 AM2019-08-08T09:13:21+5:302019-08-08T09:14:07+5:30

whatsapp join usJoin us
NEW RECORD : Colin Ackermann made T20 history in record-breaking Leicestershire cricket club win | ट्वेंटी-20 World Record; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने घेतली भल्याभल्यांची फिरकी

ट्वेंटी-20 World Record; दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजाने घेतली भल्याभल्यांची फिरकी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लेइसेस्टर : दक्षिण आफ्रिकेचा 28 वर्षीय गोलंदाज कॉलीन अ‍ॅकर्मेनने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये गुरुवारी विश्विक्रमाला गवसणी घातली. व्हिटॅलिटी ब्लास्ट ट्वेंटी-20 लीगमध्ये लेइसेस्टरशायर क्लबकडून खेळताना हा विक्रम केला. लेइसेस्टर क्लबच्या 6 बाद 189 धावांचा पाठलाग करताना बर्मिंगहॅम बेअर्स संघाचा संपूर्ण डाव 134 धावांत गडगडला. लेइसेस्टरच्या या विजयात कॉलीनने सिंहाचा वाटा उचलला. त्यानं 4 षटकांत 18 धावांत 7 फलंदाज बाद केला. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. लेइसेस्टरने या विजयासह उपांत्यपूर्व फेरीच्या दिशेनं आगेकूच केली आहे. यापूर्वी हा विक्रम सोमेरसेटच्या अ‍ॅरूल सुफीआहच्या नावावर होता. त्यानं 2011मध्ये ग्लॅमोर्गन क्लबविरुद्ध 5 धावांत 6 विकेट्स घेतल्या होत्या.  

लेइसेस्टर संघाने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 189 धावा केल्या. हॅरी स्विंडेल्स आणि लुईस हिल यांनी अर्धशतकी खेळी केली. स्विंडेल्सने 50 चेंडूंत 6 चौकारांसह 63 धावा केल्या, तर हिलने 28 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार खेचून 58 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात बेअर्स संघाचा डाव 17.4 षटकांत 134 धावांत गडगडला. सॅम हेन ( 61) आणि  अ‍ॅडम होसे ( 34) वगळता बेअर्सच्या फलंदाजांना कॉलीनच्या फिरकीसमोर टीकता आले नाही. 


पाहा व्हिडीओ

Web Title: NEW RECORD : Colin Ackermann made T20 history in record-breaking Leicestershire cricket club win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.