लंडन : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) केलेले क्रिकेटचे नवे नियम २८ सप्टेंबरपासून अमलात येणार असून ते सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांना लागू होतील. हेल्मेटला लागून कॅच घेतलेल्या चेंडूवरही आता बाद ठरविले जाणार आहे.
सध्या सुरू असलेली भारत-आॅस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांची मालिका ही जुन्या नियमांनुसार खेळली जाणारी शेवटची मालिका असेल. त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका-बांगलादेश आणि पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकांपासून सुधारित नियम लागू होतील.
‘आयसीसी’चे महाव्यवस्थापक (क्रिकेट) जिआॅफ अॅलरडाईस यांनी सांगितले की, एमसीसीने क्रिकेट खेळाच्या नियमांमध्ये जे बदल केले त्यानुरूपच या सुधारणा करण्यात आल्या आहेत. पंचांना नवे नियम पूर्णपणे समजावेत यासाठी त्यांच्यासाठी अलीकडेच एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यामुळे आता नवे नियम लागू करण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
बॅटचा आकार : बॅटच्या लांबी-रुंदीच्या मापात कोणताही बदल नाही. मात्र बॅटच्या कडांची
जाडी ४० मिमीपेक्षा जास्त व मागील भागाच्या मधला फुगीरपणा ६७ मिमीपेक्षा जास्त असू शकणार
नाही. फलंदाज खेळण्यासाठी घेऊन आलेली बॅट ‘वैध’ आहे की नाही हे ठरविण्यासाठी पंचांना बॅटच्या मोजमापाचे साधन (गेज) दिले जाईल.
झेल :
अ) क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर हवेत उडी मारून झेल पकडण्यासाठी सीमारेषेच्या आतून उडी मारली असेल तरच तो झेल वैध मानला जाईल अन्यथा चेंडू सीमापार गेला असे मानून चौकार दिला जाईल.
ब) क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटवर आपटून आलेला चेंडू ‘डेड’ मानला जाणार नाही. अशा हेल्मेटवर आपटून आलेल्या चेंडूवरही फलंदाज झेलबाद, धावबाद किंवा यष्टिचीत होऊ शकेल.
धावचीत :
क्रीझच्या दिशेने धावणाºया किंवा झेप घेणाºया फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीझच्या आत टेकलेली असेल पण चेंडू प्रत्यक्ष यष्टीला लागताना त्याच्या शरीराचा जमिनीशी स्पर्श झालेला नसेल तरी त्याला धावचीत ठरविले जाणार नाही. यष्टिचीत होण्याचे टाळण्यासाठी मागे वळणाºया फलंदाजासही हाच नियम लागू असेल.
बेशिस्त खेळाडूंवर कारवाई :
पंचाला धमकावणे, त्याच्या अंगावर जाणे, धक्काबुक्की करणे आणि कोणावरही शारीरिक हल्ला करणे यासारखे बेशिस्त वर्तन ‘लेव्हल ४’ची बेशिस्त मानली जाईल व तसे करणाºया खेळाडूला पंच मैदानाबाहेर पाठवू शकेल.
निर्णय फेरविचार पद्धत (डीआरएस)
अ) कसोटी सामन्यात डावाचा खेळ ८० षटकांहून जास्त झाल्यानंतर पंचांचा निर्णयाचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ मागता येणार नाही. ब) टी-२० सामन्यांमध्येही संघ ‘डीआरएस’चा वापर करू शकतील. क) पंचांच्या ‘कॉल’मुळे ‘डीआरएस’नंतर एखादा निर्णय कायम राहिला तर त्या संघाने ‘रिव्ह्यू’ची एक संधी गमावली, असे मानले जाणार नाही.
Web Title: New rules of cricket; Tomorrow will come in handy, catching helmet balls!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.