मुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये आज चौथा एकदिवसीय सामना होणार आहे तसेच दक्षिण आफ्रिका आणि यूएईमध्येही कसोटी सामना होणार आहे. हे दोन्ही सामने नव्या नियमानुसार खेळवले जाणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजपासून नव्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. जाणून घ्या काय आहेत नवे नियम....
रेड कार्ड फुटबॉलप्रमाणे आता क्रिकेटच्या मैदानावरही बेशिस्तपणा करणा-या खेळाडूंना रेडकार्ड दाखवण्यात येईल. नव्या नियमानुसार एखाद्या खेळाडूने मैदानावर गंभीर गैरवर्तन केले तर, त्याला संपूर्ण सामन्यासाठी मैदानाबाहेर काढले जाऊ शकते. पंचांना धमकावणे, पंचाच्या दिशेने शेरबाजी, हातवारे करणे, मैदानावर धक्काबुक्की आणि अन्य कुठल्याही प्रकारचा हिंसाचार यापुढे खपवून घेतला जाणार नाही.
बॅटचा आकार : बॅटच्या लांबी-रुंदीच्या मापात कोणताही बदल नाही. मात्र बॅटच्या कडांचीजाडी ४० मिमीपेक्षा जास्त व मागील भागाच्या मधला फुगीरपणा ६७ मिमीपेक्षा जास्त असू शकणारनाही. फलंदाज खेळण्यासाठी घेऊन आलेली बॅट ‘वैध’ आहे की नाही हे ठरविण्यासाठी पंचांना बॅटच्या मोजमापाचे साधन (गेज) दिले जाईल.
झेल :अ) क्षेत्ररक्षकाने सीमारेषेवर हवेत उडी मारून झेल पकडण्यासाठी सीमारेषेच्या आतून उडी मारली असेल तरच तो झेल वैध मानला जाईल अन्यथा चेंडू सीमापार गेला असे मानून चौकार दिला जाईल.ब) क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या हेल्मेटवर आपटून आलेला चेंडू ‘डेड’ मानला जाणार नाही. अशा हेल्मेटवर आपटून आलेल्या चेंडूवरही फलंदाज झेलबाद, धावबाद किंवा यष्टिचीत होऊ शकेल.
धावचीत :क्रीझच्या दिशेने धावणाºया किंवा झेप घेणाºया फलंदाजाची बॅट पॉपिंग क्रीझच्या आत टेकलेली असेल पण चेंडू प्रत्यक्ष यष्टीला लागताना त्याच्या शरीराचा जमिनीशी स्पर्श झालेला नसेल तरी त्याला धावचीत ठरविले जाणार नाही. यष्टिचीत होण्याचे टाळण्यासाठी मागे वळणाºया फलंदाजासही हाच नियम लागू असेल.
बेशिस्त खेळाडूंवर कारवाई :पंचाला धमकावणे, त्याच्या अंगावर जाणे, धक्काबुक्की करणे आणि कोणावरही शारीरिक हल्ला करणे यासारखे बेशिस्त वर्तन ‘लेव्हल ४’ची बेशिस्त मानली जाईल व तसे करणाºया खेळाडूला पंच मैदानाबाहेर पाठवू शकेल.
निर्णय फेरविचार पद्धत (डीआरएस)अ) कसोटी सामन्यात डावाचा खेळ ८० षटकांहून जास्त झाल्यानंतर पंचांचा निर्णयाचा ‘टॉप अप रिव्ह्यू’ मागता येणार नाही. ब) टी-२० सामन्यांमध्येही संघ ‘डीआरएस’चा वापर करू शकतील. क) पंचांच्या ‘कॉल’मुळे ‘डीआरएस’नंतर एखादा निर्णय कायम राहिला तर त्या संघाने ‘रिव्ह्यू’ची एक संधी गमावली, असे मानले जाणार नाही.