भारतीय संघानं पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडला पराभवाची चव चाखवली. २०-२० षटकांच्या या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४००+ धावा चोपल्या. तेच दुसरीकडे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली आणि १५३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला गेला. ऑस्ट्रेलियाचा ३४ वर्षीय गोलंदाज जॅक्सन बर्ड ( Jacson Bird) याच्यासमोर प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. न्यू साऊथ वेल्स आणि तस्मानिया ( New South Wales Vs Tasmania ) यांच्यातल्या या सामन्यात या लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झाली. जॅक्सन बर्डनं १८ धावांत ७ विकेट्स घेताना तस्मानिया संघाला ३०० धावांची आघाडी मिळवून दिली.शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ( Sheffield Shield ) या सामन्यात न्यू साऊथ वेल्स संघाचा संपूर्ण डाव १९.३ षटकांत ३२ धावांवर गडगडला. शेफिल्ड शील्ड स्पर्धेतील ही चौथी निचांक खेळी आहे. यापूर्वी १८६८-६९ साली न्यू साऊथ वेल्स संघ ३७ धावांवर तंबूत परतला होता.
तस्मानियाकडून सर्वोत्तम गोलंदाजी८-९५ - पीटर क्लॉघ, १९८३-८४७-१८ - जॅक्सन बर्ड, २०२०-२१७-४५ - जॅक्सन बर्ड, २०१५-१६ ७-४९ - कॉलीन मिलर, १९९७-९८७-५४ - अॅडम ग्रिफिथ, २००४-०५