नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी झाली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:41 PM2022-12-22T19:41:57+5:302022-12-22T19:42:27+5:30

whatsapp join usJoin us
New Year, New Beginning! Hardik Pandya will be announced as the new T20 captain for India | नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित

नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Hardik Pandya will be announced as the new T20 captain :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी झाली होती. रोहित शर्माचं वय पाहता त्याच्याकडे आता ट्वेंटी-२० संघाची जबाबदारी कायम राहण्याची शक्यता कमीच होती. त्यानुसार BCCIने हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) याच्याकडे टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची सोपवण्याची तयारी जवळपास निश्चित केली आहे.  हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताची युवा ब्रिगेड न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती आणि तेथे त्यांनी ट्वेंटी-२० मालिका जिंकली होती. त्याआधी आयर्लंड दौऱ्यावरही भारताने विजय मिळवला होता. 

२०२४मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी बीसीसीआय मर्यादित षटकांच्या या प्रकारात युवा खेळाडूंना पाहत आहे आणि त्यासाठी आतापासूनच त्यांनी कंबर कसली आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) हा नवीन वर्षातील पहिल्याच मालिकेत टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. भारत-श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मुंबईत पहिली लढत होईल आणि त्यानंतर पुणे ( ५ जानेवारी ) व राजकोट ( ७ जानेवारी) येथे अनुक्रमे दुसरी व तिसरी मॅच होईल.

काल बीसीसाआयची बैठक पार पडली, परंतु त्यात कर्णधारपदाबाबत कोणतीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले गेले. पण, श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० व वन डे मालिकेआधीच हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल, अशी सूत्रांची माहिती आहे. रोहित शर्माकडे वन डे व कसोटी संघाचे नेतृत्व कायम ठेवले जाईल. भारतात पुढील वर्षी होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत रोहितकडे वन डे संघाचे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या सर्कलपर्यंत कसोटीचे नेतृत्व कायम असेल. 

आयपीएल जेतेपद पटकावल्यानंतर हार्दिकला डिमांड...

इंडियन प्रीमिअर लीग २०२२ मध्ये नव्याने दाखल झालेल्या गुजरात टायटन्सने जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला रिलीज केल्यानंतर गुजरातने संधी साधली अन् लोकल बॉय हार्दिकला कॅप्टन बनवले. त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच प्रयत्नात गुजरातने जेतेपद पटकावले आणि त्यानंतर त्याच्याकडे  टीम इंडियाचा भावी ट्वेंटी-२० कर्णधार म्हणून पाहिले जाऊ लागले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: New Year, New Beginning! Hardik Pandya will be announced as the new T20 captain for India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.