Join us  

India vs Pakistan यांच्यातला ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा सामना 'या' मैदानावर होणार; ICC ची घोषणा 

T20 World Cup 2024 - भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उतरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 5:56 PM

Open in App

T20 World Cup 2024  (Marathi News) :  भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जूनमध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उतरेल. या वर्ल्ड कपपूर्वी शेवटची ट्वेंटी-२० मालिका ( वि. अफगाणिस्तान) भारताने ३-० अशी जिंकली. आता भारतीय क्रिकेट चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती १ जून २०२४ ची. अमेरिका व वेस्ट इंडिज यांच्या संयुक्त विद्यमाखाली ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजमधील सर्व सामने अमेरिकेत होणार आहेत आणि त्यात भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) या हायव्होल्टेज सामन्याचाही समावेश आहे.

आयसीसीने आज न्यू यॉर्क येथील  Nassau County International Cricket Stadium ची पहिली झलक दाखवली, जिथे भारत-पाकिस्तान लढतीसह वर्ल्ड कपमधील ८ सामने होणार आहेत. ३४ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या स्टेडियमवर आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही. पुढील ३ महिन्यांत या स्टेडियमचे काम पूर्ण होणार आहे. येथे भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना ९ जून २०२४ ला खेळवण्यात येणार आहे. फॉर्म्युला १ लास व्हेगास ग्रँड प्रिक्ससाठी वापरण्यात आलेला ग्रँडस्टँडही क्रिकेटच्या स्टेडियमवर लावण्यात येणार आहे.    

ICC चे मुख्य कार्यकारी ज्योफ अॅलार्डिस म्हणाले, "आम्ही आयसीसी पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या आधी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे अनावरण करताना आनंदी आहोत."

पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा 

 

गटवारी अ - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिकाब - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमानक - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनीड - दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ

स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये  ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल

भारतीय संघाचे वेळापत्रक

५ जून - वि. आयर्लंड, न्यू यॉर्क९ जून - वि. पाकिस्तान. न्यू यॉर्क१२ जून - वि. अमेरिका, न्यू यॉर्क१५ जून - वि. कॅनडा, फ्लोरिडा 

टॅग्स :ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारत विरुद्ध पाकिस्तानअमेरिका