नवी दिल्ली : अंडर-१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेत शानदार फलंदाजी करीत असलेला भारतीय खेळाडू शुभमान गिलचे तंत्र आणि क्षमता बघितल्यानंतर जाणकार त्याचा पंजाब क्रिकेटचा नवा युवराज म्हणून उल्लेख करीत आहेत.
पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील फजिल्का शहरातील या १८ वर्षीय क्रिकेटपटूने अंडर-१९ विश्वकप क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत ३४१ धावा फटकावल्या आहेत. कर्णधार पृथ्वी शॉपेक्षा त्याने अधिक धावा फटकावल्या आहेत. आयपीएल लिलावामध्ये शुभमानवर पैशांचा पाऊस पडला आहे. या युवा खेळाडूसाठी कोलकाता नाईट रायडर्सने १.८ कोटी रुपयांची बोली लावली.
पंजाबचा कर्णधार हरभजन सिंगच्या मते, शुभमानमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. हरभजन म्हणाला, ‘शुभमान जेवढ्या दर्जेदार गोलंदाजांना सामोरे जाईल तेवढी त्याच्या कामगिरीत सुधारणा होईल. तो वेगवेगळ्या वातावरणात खेळेल आणि अडचणीच्या स्थितीत धावा कशा वसूल करता येतील,
याची त्याला माहिती होईल. मी युवराजला १८ वर्षांचा असताना बघितले आहे. शुभमान युवराजप्रमाणे प्रतिभावान आहे.’
शुभमान क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत खेळण्यात उत्सुक आहे. इंग्लंडचा माजी सलामीवीर रॉबर्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये शुभमान म्हणाला, ‘परिस्थितीसोबत जुळवून घेणे आवश्यक आहे. मी खेळाच्या तिन्ही प्रकारांत खेळण्यास उत्सुक आहे.’
शॉप्रमाणे शुभमानने वयोगटातील क्रिकेटमध्ये खोºयाने धावा
वसूल केल्या आहेत. त्याला बीसीसीआयने २०१३-१४ मध्ये अंडर-१४ व २०१४-१५ मध्ये अंडर-१६ गटात सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्काराने गौरविले आहे. (वृत्तसंस्था)
सर्वांत मोठी बाब म्हणजे आधुनिक क्रिकेटमध्ये खेळले जाणारे सर्व फटके त्याच्या भात्यात आहेत. तो दिलस्कूल, रॅप व उंचावरून फटके मारू शकतो. पूल शॉटवरही त्याचे चांगले नियंत्रण आहे.
- हरभजनसिंग
शुभमान सुरुवातीपासून क्रिकेटप्रती समर्पित : लखविंदरसिंग गिल
चंदीगड : अंडर-१९ विश्वकप स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत असलेला भारतीय क्रिकेटपटू शुभमान गिल सुरुवातीपासून क्रिकेटप्रती समर्पित असल्याची प्रतिक्रिया त्याच्या वडिलांनी व्यक्त केली.
शुभमानचे वडील लखविंदरसिंग म्हणाले, ‘शुभमान सुरुवातीपासून क्रिकेटप्रती समर्पित आहे. विश्वकप स्पर्धेतील त्याच्या कामगिरीमुळे आनंद झाला असून त्याचा मला अभिमानही आहे. पाकविरुद्ध शतक झळकावल्यामुळे विशेष आनंद झाला. पाकविरुद्धच्या विजयाचा तो शिल्पकार ठरला. शुभमानला दुसरे कुठले खेळणे आवडत नव्हते. तो नेहमी बॅट व बॉलसोबत खेळत होता.
४झोपायला जाण्यापूर्वीही तो खेळत होता. आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा दिला. त्याला जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू बनविण्यासाठी आम्ही १५ वर्षे समर्पित केले. आम्ही स्वत:चे काम विसरलो आणि त्याला क्रिकेटला वेळ देता यावा यासाठी अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमातही सहभागी झालो नाही.’
Web Title: The new Yuvraj of Shubham Punjab Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.