ठळक मुद्देन्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले होतेअझर अलीले एकाकी किल्ला लढवून पाकिस्तानचे आव्हान जीवंत ठेवले होते.अझरला बाद करत पटेलने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
अबुधाबी : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी चांगलीच रोमहर्षक झाली. पण या लढतीत अखेर न्यूझीलंडनेपाकिस्तानवर अवघ्या चार धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी 176 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात आश्वासक झाली नाही. पण अझर अलीले एकाकी किल्ला लढवून पाकिस्तानचे आव्हान जीवंत ठेवले होते. पण अखेर तोच पायचीत झाला आणि न्यूझीलंडने विजयोत्सव साजरा केला. अलीने पाच चौकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी साकारली. पाकिस्तानच्या अखेरच्या चार फलंदाजांना यावेळी भोपळाही फोडता आला नाही.
न्यूझीलंडकडून डावखुरा फिरकीपटू अजाझ पटेलने भेदक मारा केला. पटेलने यावेळी 59 धावा देत पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी पाकिस्तानला पहिला आणि शेवटचा धक्का पटेलनेच दिला. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकला त्याने बाद करत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर अझरला बाद करत पटेलने न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
Web Title: New Zealand beat Pakistan in a thrilling test match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.