मुंबई : भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण असल्याचे वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने केले आहे. न्यूझीलंडविरोधात उद्यापासून सुरू होत असलेल्या तीन कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला प्रबळ दावेदाराच्या रूपात भारत सुरुवात करणार आहे.वानखेडे स्टेडियमवर उद्या होणा-या सामन्याच्या पूर्वसंध्येला विल्यम्सन म्हणाला की, ‘‘मायदेशात भारताचे रेकॉर्ड चांगले राहिले आहे. त्यांना पराभूत करणे कठीण होईल. आम्हाला माहीत आहे, की मायदेशात भारत सर्वाधिक मजबूत संघ आहे. आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल यात कोणतीही शंका नाही.’’ २००९-१० नंतर भारताने मायदेशात खेळलेल्या १६ मालिकांपैकी फक्त दोनच मालिका गमावल्या आहेत. त्याने सांगितले की, सामन्यात मार्टिन गुप्टील आणि मुनरो सलामीला खेळतील, तर लॅथम मधल्या फळीत खेळेल. लॅथमने गेल्या काही सत्रात चांगला सराव केला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचं विधान
भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याचं विधान
भारताला मायदेशात पराभूत करणे कठीण असल्याचे वक्तव्य न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन याने केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:33 PM