वेलिंग्टन - क्रिकेटमध्ये खेळाडूने वयाची पस्तिशी ओलांडली की त्याला निवृत्तीचे वेध लागतात. बहुतांश क्रिकेटपटू साधारणत: 35 ते 40व्या वर्षांपर्यंत सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून इतर उद्योग व्यवसायात गुंतवतात. मात्र याला काही अपवादही आहेत. त्यापैकीच एक म्हणजे न्यूझीलंडचा गोलंदाज इव्हान चॅटफिल्ट. एकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे चॅटफिल्ड वयाच्या 68व्या वर्षापर्यंत स्थानिक क्रिकेटमध्ये खेळत होते. अखेरीस शनिवारी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली. चॅटफिल्ड यांनी 43 कसोटी आणि 114 एकदिवसीय सामन्यांत न्यूझीलंडचे प्रतिनिधित्व केले होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर झाल्यानंतरही ते क्रिकेटच्या मैदानात सक्रिय होते. निनी ओल्ड बॉइज या क्लबकडून ते क्रिकेट खेळत असत. ''आता वयाच्या 68 व्या वर्षी मला असलेल्या अपेक्षेप्रमाणे क्रिकेट खेळणे मला शक्य होत नाही. त्यामुळे मी आता क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे चॅटफिल्ड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. इव्हान चॅटफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 कसोटीत 123 बळी आणि 114 एकदिवसीय सामन्यांत 140 बळी टिपले होते. तसेच प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी एकूण 157 सामने खेळताना 587 बळी टिपले होते. 1987 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या चेतन शर्मा यांनी जेव्हा विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा बळी चॅटफिल्ड ठरले होते. त्यावेळी चेतन शर्मा यांनी चॅटफिल्ड यांचा त्रिफळा उडवला होता.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- न्यूझीलंडच्या या क्रिकेटपटूने अखेर वयाच्या 68 व्या वर्षी स्वीकारली निवृत्ती
न्यूझीलंडच्या या क्रिकेटपटूने अखेर वयाच्या 68 व्या वर्षी स्वीकारली निवृत्ती
क्रिकेटमध्ये खेळाडूने वयाची पस्तिशी ओलांडली की त्याला निवृत्तीचे वेध लागतात. बहुतांश क्रिकेटपटू साधारणत: 35 ते 40व्या वर्षांपर्यंत सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून इतर उद्योग व्यवसायात गुंतवतात. मात्र एखादा खेळाडू वयाच्या 68 व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळत असेल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 4:09 PM
ठळक मुद्देएकेकाळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे चॅटफिल्ड वयाच्या 68व्या वर्षी निवृत्त झालेइव्हान चॅटफिल्ड यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 43 कसोटीत 123 बळी आणि 114 एकदिवसीय सामन्यांत 140 बळी टिपले1987 च्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या चेतन शर्मा यांनी जेव्हा विश्वचषक स्पर्धेतील पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. त्यावेळी त्यांचा तिसरा बळी चॅटफिल्ड ठरले होते