India vs New Zealand, 2nd ODI Live : भारतीय संघाने २०२३ मधील दुसरी वन डे मालिका जिंकली. गोलंदाजांच्या कामगिरीमुळे भारताला आजचा सामना सहज जिंकता आला. या मालिका विजयासह भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून विजयात हातभार लावला अन् भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. जागतिक क्रमवारीत नंबर १ असलेल्या न्यूझीलंडला भारताने पराभूत केले. घरच्या मैदानावरील मागील २४ मालिकांमधील भारताचा हा २२ वा मालिका विजय आहे.
भारताच्या या विजयानंतर ICC ने मोठी घोषणा केली. ICC पुरुष वन डे क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. या सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेटने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आयसीसी पुरुषांच्या वन डे क्रमवारीत मोठा फटका बसला, तर टीम इंडियाला फायदा झाला आहे. रायपूरमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर ICC पुरुष वन डे रँकिंगमध्ये न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे आणि इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर सरकला आहे. या सामन्यापूर्वी न्यूझीलंड ११५ रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर होता. इंग्लंड ११३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या, ११२ रेटिंग गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि १११ रेटिंग गुणांसह भारत चौथ्या स्थानावर होता. भारताकडून पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंड ११३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचबरोबर भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
या मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले तर आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वन होण्याची सुवर्णसंधी असेल. टीम इंडियाने या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास त्याचे ११४ गुण होतील आणि न्यूझीलंडचा संघ १११ गुणांवर घसरेल. अशा परिस्थितीत या मालिकेनंतर टीम इंडियाला वनडेमध्ये नंबर वन होण्याची संधी आहे.