ऑकलंड : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना सुपर ओव्हरमध्ये गेला होता. या थरारक सामन्यात अखेर भारताने बाजी मारली. पण जर ही सुपर ओव्हर टाय झाली असती तर मी संन्यास घेतला असता, असे धक्कादायक विधान न्यूझीलंडच्या एका खेळाडूने केले आहे.
न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाने ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवत इतिहास रचला आहे. कारण भारताला पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये ट्वेन्टी-२० मालिका जिंकता आली आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा ट्वेन्टी-२० सामना चांगलाच रंगतदार झाला. न्यूझीलंडचा संघ हा सामना सहज जिंकेल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. कारण अखेरच्या षटकात न्यूझीलंडचा जिंकायला ९ धावांची गरज होती. षटकाच्या सुरुवातीलाच एक षटकारीही आला होता. पण मोक्याच्या क्षणी विल्यमसन बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर रॉस टेलर आऊट झाला आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
भारताने हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये जिंकला. भारताच्या या विजयाचा नायक ठरला तो रोहित शर्मा. कारण अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावत रोहितने संघाला विजय मिळवून दिला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामधील जेव्हा सुपर ओव्हरचा सामना सुरु होता. तेव्हा समालोचन करायला न्यूझीलंडचे माजी क्रिकेटपटू इयान स्मिथ उपस्थित होते. तेव्हा त्यांनी, जर ही सुपर ओव्हर बरोबरीत सुटली तर मी संन्या घेईन, अशी घोषणा त्यांनी केली होती.