Michael Bracewell, NZ vs IRE T20I : न्यूझीलंडने वन डे मालिकेपाठोपाठ आयर्लंडला ट्वेंटी-२० मालिकेतही पराभूत केले. काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ८८ धावांनी विजय मिळवताना ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. वन डे मालिकेतील स्टार मिचेल ब्रेसवेल याने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात कमाल केली. त्याने त्याच्या पहिल्याच षटकात ५ चेंडूंत हॅटट्रिक घेत आयर्लंडचा डाव ९१ धावांवर गुंडाळला. न्यूझीलंडकडून ट्वेंटी-२०त हॅटट्रिक घेणारा तो तिसरा खेळाडू ठरला. न्यूझीलंडने विजयासाठी १८० धावांचे लक्ष्य ठेवले होते.
डेन क्लेव्हर ( Dane Cleaver ) याने ५५ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकार खेचून ७८ धावांची नाबाद खेळी केली. फिन अॅलन ( ३५) व ग्लेन फिलिप ( २३) यांनी उपयुक्त खेळी केली. न्यूझीलंडने ४ बाद १७९ धावा केल्या. आयर्लंडच्या क्रेग यंग व जोश लिटल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात मार्क एडर ( २७) व पॉल स्टर्लिंग ( २१) वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. इश सोढीने तीन, जेकब डफीने दोन व ल्युकी फर्ग्युसनने १ विकेट घेतल्यानंतर मिचेल ब्रेसवेलने कमाल केली. त्याला १४ वे षटक टाकण्यासाठी दिले आणि त्याने त्याच्या पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेतली.
पहिल्या चेंडूवर चौकार नंतर एक धाव दिल्यानंतर ब्रेसवेलने पुढील तीन चेंडूंत तीन विकेट्स घेत आयर्लंडचा डाव ९१ धावांवर गुंडाळला. ब्रेसवेलच्या आधी जेसब ओराम ( वि. श्रीलंका, २००९) व टीम साऊदी ( वि. पाकिस्तान, २०१०) या किवी गोलंदाजांनी ट्वेंटी-२०त हॅटट्रिक घेतली आहे.
Web Title: New Zealand have defeated Ireland by 88 runs in the 2nd T20I, Michael Bracewell in his first over itself takes a hat-trick, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.