न्यूझीलंडने तिरंगी मालिकेत मंगळवारी पाकिस्तानला पराभूत केले. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीसाठी न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाकिस्तानला आज किवींनी जमिनीवर आणले. ९ विकेट्स व २३ चेंडू राखूंन न्यूझीलंडने मालिकेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली. किंवीच्या ताफ्यात खेळणारे चेन्नई सुपर किंग्सचे दोन खेळाडूच पाकिस्तानवर भारी पडले.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांत ७ बाद १३० धावा करता आल्या. मोहम्मद रिझवान ( १६) व बाबर आजम ( २१) हे सलामीवीर अपयशी ठरले आणि पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनीही पाट्या टाकल्या. इफ्तिकार अहमद ( २७) व आसीफ अली ( २५*) यांनी किवींचा थोडाफार सामना केला. टीम साऊदी ( २-३१), मिचेल सँटनर ( २-२७) व मिचेल ब्रेसवेल ( २-११) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इश सोढीने १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात फिन अॅलन व डेव्हॉन कॉनवे यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांना चोपले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. फिन ४२ चेंडूंत १ चौकार व ६ षटकारांसह ६२ धावांत माघारी परतला, तर कॉनवेने ४६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीने नाबाद ४९ धावा केल्या. केन विलियम्सनन ९ धावांवर नाबाद राहिला आणि किवींनी १६.१ षटकांत १ बाद १३१ धावा करून विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: New Zealand have defeated Pakistan in the Tri-Series. Finn Allen scored 62, Devon Conway scored an unbeaten 49, Mitchell Santner 2/27
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.